केरळ टुरिझमची हिवाळी सीझनदरम्‍यान पर्यटकांना आकर्षित करण्‍यासाठी मोठी योजना

Uncategorized
Spread the love

नागपूर, नोव्‍हेंबर 15: सणासुदीच्‍या काळात देशांतर्गत पर्यटकांच्‍या आगमनामध्‍ये मोठी वाढ झाल्‍याने आपल्‍या उपक्रमांना मिळालेल्‍या भव्‍य यशानंतर केरळ टुरिझमने देशभरातील व देशाबाहेरील अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्‍यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली आहे.

पर्यटन मंत्री श्री. पीए मोहम्मद रियास म्हणाले की नुकताच संपलेला सणासुदीचा काळ केरळच्या पर्यटनासाठी सकारात्मक होता आणि मोठ्या संख्येने देशांतर्गत पर्यटकांनी राज्याला भेट दिली, ज्‍यामधून कोविड-नंतरच्‍या काळात पर्यटनाला मिळालेली उसळी दिसून आली.

ते महणाले ‘’आम्ही केरळमध्ये हिवाळ्यातील सुट्टीच्या मोसमाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहोत, ज्‍याचा टाइम मासिकच्‍या ’५० एक्‍स्‍ट्राऑर्डनरी डेस्टिनेशन्‍स ऑफ द वर्ल्‍ड टू एक्‍स्‍प्‍लोर इन २०२२’ मध्‍ये समावेश करण्‍यात आला आहे. राज्‍याचे वेगळेपण पर्यटक वाट पाहत असलेले विविध अनुभव जसे हाऊसबोट्स, कॅराव्हॅन स्टे, जंगल लॉज, वृक्षारोपण भेटी, होमस्टे, आयुर्वेद-आधारित वेलनेस सोल्यूशन्स आणि साहसी उपक्रमांसोबतच परिसरात फेरफटका, हिरवळ असलेल्‍या टेकड्यांवर ट्रेकिंग यामधून दिसून येते.’’

सुरू असलेली चॅम्पियन्‍स बोट लीग (बीबीएल) आणि डिसेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ दरम्‍यान आयोजित करण्‍यात येणारी जागतिक स्तरावर प्रशंसित कोची-मुझिरिस बिएनाले (केएमबी) भारत व परदेशातील पर्यटकांना आकर्षित करेल, असा विश्वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

मंत्रींनी केरवन केरळचाही उल्लेख केला. राज्याच्‍या या गेम-चेंजिंग कारवाँ पर्यटन उपक्रमाला अल्पावधीतच उद्योगाकडून प्रचंड प्रतिसाद मिळवला आहे. ते म्हणाले, “पर्यटकांना आमच्या निसर्गरम्य राज्याच्‍या भेट न दिलेल्या ठिकाणांचा आनंद देण्‍यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.’’

पर्यटन प्रधान सचिव श्री. के. एस. श्रीनिवास म्हणाले की, राज्याच्या पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगाने आधीच महामारीपूर्वीची क्षमता परत मिळवली आहे. ते पुढे म्हणाले, “केरळने चालू वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत देशांतर्गत पर्यटकांच्या आगमनात मागील वर्षाच्‍या तुलनेत जवळपास १९६ टक्क्यांनी वाढ केल्‍याचे यावरून स्पष्ट होते.”

केरळमध्ये या सप्टेंबरपर्यंतच्या नऊ महिन्यांत एकूण १,३३,८०,००० देशांतर्गत पर्यटकांची नोंद झाली आहे, ही आकडेवारी कोविड २०१९ पूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत १.४९ टक्क्यांनी वाढली आहे.

‘’केरळ ट्रॅव्हल मार्टमधील सहभागाचा समावेश असलेल्या सावधपणे तयार केलेल्या प्रचारात्मक आणि विपणन धोरणांद्वारे योग्यरित्या तयार केलेल्या ‘केरावन केरळ’ सारख्या नवीन उत्पादनांच्या प्रदर्शनामुळे देशांतर्गत पर्यटकांच्या आगमनात लक्षणीय वाढ शक्य झाली,” असे श्रीनिवास म्हणाले, “आमचे नवीन पर्यटनाला चालना देणारे उपक्रम पर्यावरणीय अत्यावश्यकता आणि शाश्वततेशी सुसंगत आहेत.”

पर्यटन संचालक श्री. पी. बी. नूह म्हणाले, “आम्ही केरळचे नवीन प्रकल्प तसेच समुद्रकिनारे, हिल स्टेशन्स, हाऊसबोट्स आणि बॅकवॉटर सेगमेंट यांसारख्या मुख्य मालमत्तेचे प्रदर्शन करण्यावर प्रभावीपणे भर देण्यासाठी विस्तृत योजना आखल्या आहेत, ज्‍यामुळे पर्यटकांना अद्वितीय अनुभव मिळेल.’’

प्रिंट, टीव्ही, रेडिओ आणि डिजिटल प्लॅटफॉर्म अशा विविध माध्यमांचाही यासाठी फायदा घेतला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. “आम्ही केरळला संपूर्ण जगभरातील पर्यटकांसाठी एक सुरक्षित, मोहक आणि आदरातिथ्य गंतव्‍य म्हणून दाखविण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत.”

या महिन्यात सुरुवातीला मुंबईत आणि पुणे झालेल्या पहिल्या दोन बी२बी भागीदारी मेळाव्याला उद्योगांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केरळ टुरिझमने प्रवासी व्यापार नेटवर्किंग उपक्रमांची मालिका आखली आहे, ज्यात व्यापार मेळ्यांमध्ये सहभाग घेणे आणि नवीन उत्पादनांची व्यापक ग्राहकांना ओळख करून देण्यासाठी बी२बी रोड शो आयोजित करणे समाविष्ट आहे.

देशांतर्गत कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केरळ पर्यटन ओटीएम (आउटबाउंड ट्रॅव्हल मार्केट) मुंबई; साऊथ एशियन ट्रॅव्‍हल अॅण्‍ड टुरिझम एक्‍स्‍चेंज (एसएटीटीई), नवी दिल्ली; व टीटीएफ चेन्नई यासारख्या व्यापार मेळ्यात सहभाग घेतील आणि नोव्हेंबरच्या, इंदूर येथे रोड शो आयोजित करतील;

डिसेंबरमध्ये भुवनेश्वर, कोलकाता, वडोदरा आणि सुरत येथे बी२बी व्यापार बैठकांची आणखी एक मालिका नियोजित करण्यात आली आहे.

 143 Total Likes and Views

0 Comments

No Comment.