कोणत्याही पक्ष्याला मधुमेह होत नाही.
कोणत्याही माकडाला हृदयविकाराचा झटका येत नाही.
कोणताही प्राणी आयोडीनयुक्त मीठ खात नाही किंवा दात घासत नाही, तरीही कोणालाही थायरॉईड होत नाही आणि त्याचे दातही खराब होत नाहीत.
माकडाच्या शरीर रचनेत आणि माणसाच्या शरीर रचनेत सर्वात जवळचा संबंध आहे. माकडात आणि माणसात फरक एवढाच असतो की माकडाला शेपूट आहे, आणि माणसाला ते नाही ,बाकी सर्व काही सारखेच आहे.
*मग माकडाला कधीच हृदयविकाराचा झटका,मधुमेह, हाय बीपी का होत नाही ?*
माकड कधीच आजारी पडत नाही आणि आजारी पडलेच तर ते जगत नाही मरते !
*माकड आजारी का पडत नाही ?*
मेडिकल कॉलेजमधील एका प्रोफेसरांनी माकडाला आजारी पाडण्यासाठी खूप खोलवर संशोधन केले. त्यांनी माकडाच्या शरीरात विविध प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया सोडण्यास सुरुवात केली, कधी इंजेक्शनद्वारे, तर कधी अन्य मार्गाने ते माकडावर प्रयोग करीत होते. ते म्हणतात, मी गेली 15 वर्षे प्रयोग करतोय पण प्रत्येक वेळी मी फेल झालोय , पण माकड काही आजारी पडलेच नाही.
*माकडाला काहीच का होऊ शकत नाही ?*
मग एके दिवशी त्यानी हे रहस्य सांगितले,
*माकडाचा आरएच फॅक्टर सर्वात आदर्श आहे.*
जेव्हा एखादा डॉक्टर तुमचा RH फॅक्टर मोजतो तेव्हा तो त्याची तुलना माकडाच्या RH फॅक्टरशी करीत असतो .
*RH फॅक्टर मुळे माकडाला त्याला कोणताही आजार होऊ शकत नाही. त्याच्या रक्तातील कोलेस्टेरॉल कधीही वाढत नाही, त्याचे ट्रायग्लिसराइड कधीही वाढत नाही किंवा त्याला कधीही मधुमेह होत नाही.*
*बाहेरून त्याच्या शरीरात कितीही साखर शिरली तरी ती त्याच्या शरीरात टिकून रहात नाही.*
ते प्रोफेसर पुढे म्हणाले की, *माकडे नेहमी सकाळी लवकर पोट भरून खातात. त्यामुळे दिवसभर त्याला खूप मोठी एनर्जी मिळते आणि ते कोणत्याही संकटाला समर्थपणे तोंड देण्यासाठी सज्ज रहाते.*
*माणसाचे यापेक्षा खूप वेगळे असते. माणूस सकाळी कधीही पोटभरून जेवत नाही. तर तो नास्ता म्हणजेच ब्रेकफास्ट करतो. त्यामुळेच माणसाला सर्व रोग होतात. सूर्योदय होताच सर्व पक्षी आणि सर्व प्राणी अन्न खातात. न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण या गोष्टीत फक्त माणूस अडकला आहे. तेव्हापासून माणूस अधिक आजारी जीवन जगू लागला आहे.*
*प्रोफेसर रवींद्रनाथ शानवाग यांनी त्यांच्या सर्व रुग्णांना सकाळी पोटभर जेवायला सांगितले. त्यांचे रुग्ण सांगतात की, आम्ही सकाळी पोटभर जेवायला सुरुवात केली तेव्हापासून आमचा मधुमेह कमी झाला, काहींचे कोलेस्टेरॉल कमी झाले, काहींची गुडघेदुखी कमी झाली, काहींच्या पाठीचे दुखणे कमी झाले, तर काहींचे गॅस मुळे पोट बिघडणे थांबले, झोप चांगली येऊ लागली…..इ..इ.*
*हीच गोष्ट 3500 वर्षांपूर्वी वागभटजींनी सांगितली होती, ते म्हणतात की, सकाळचे जेवण हा सर्वोत्तम आहार आहे.*
सकाळी सूर्योदयाच्या अडीच तासात म्हणजे ९.३० पर्यंत, जास्तीत जास्त १० वाजेपर्यंत पोटभर जेवण केले पाहिजे. आणि हे जेवण तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही नाश्ता बंद कराल.
*या नाश्त्याची प्रथा हिंदुस्थानी नसून ती ब्रिटिशांची देणगी आहे.*
*रात्रीचे जेवण सूर्यास्त होण्यापूर्वी अर्ध्या पोटी खावे. तरच तुम्ही आजारांपासून वाचाल. सकाळी सूर्य उगवण्याच्या अडीच तासात आपल्या जठराच अग्नी खूप तीव्र झालेला असतो. कारण आपले पोट सूर्याशी संबंधित आहे. आंघोळीनंतर आपली जठराग्नी सर्वात तीव्र असते. आंघोळीनंतर पित्त वाढते, म्हणून सकाळी अंघोळ करून भोजन करावे. त्यानंतर दुसऱ्या जेवणात किमान 4 ते 8 तासांचे अंतर असावे. मध्यंतरी काहीही चटरफतर खाऊ नये आणि दिवस संपल्यानंतर अजिबात खाऊ नये.*
*पक्षी आणि वन्य प्राण्यांच्या दैनंदिन दिनचर्येत याचा समावेश असतो. ते कधीही रात्रीचे जेवण करीत नाहीत. म्हणून ते सहसा आजारी पडत नाहीत.*
551 Total Likes and Views