कमोडपेक्षा भारतीय पद्धतीचे शौचालय फायदेशीर

Analysis
Spread the love

हल्ली घरोघरी  साध्या संडासाची जागा कमोड घेताना दिसतो आहे.    खास करून ज्येष्ठ नागरिक कमोड पसंत करताना दिसतात.  त्यासाठी सोयीचे  कारण  दिले जाते.  पण डॉक्टरांच्या मते,   भारतीय पद्धतीचे शौचालय  हे आरोग्याच्या  दृष्टीने  जास्त फायदेशीर आहे.   कमोडवर आरामशीर बसता येते.  त्यामुळे  बरेच जण  शौचाला जाताना  सोबत मोबाईल नेतात, कोणी पेपर नेतात.   कमोडवर  खूप वेळ बसून राहतात. त्यामुळे   गुदद्वारावर ताण  येतो.  भारतीय पद्धतीत दोन पायांवर बसावे लागते.   त्यामुळे  फार वेळ बसणे होत नाही.   पाय पोटाजवळ येत असल्याने   त्याचा दाब पोटावर पडतो. पोटातील मळ सहजपणे बाहेर पडायला मदत होते.

        डॉक्टरांच्या मते, गुदामार्गातील प्रत्येकच आजार हा पाइल्स किंवा मुळव्याध नसतो.  त्या जागेवर ५० प्रकारचे आजार होऊ शकतात.  त्यातले बहुतेक आजार औषधाने बरे होतात. पण पेशंट लाजेखातर डॉक्टरकडे  जायला टाळाटाळ करतो.  घरगुती उपाय करतो. त्रास वाढतो तेव्हा  धावतो.                अतितेलकट, तिखट खाणे  शरीराचे नुकसान करते.   तिखट,  तेलकट खाणाऱ्यांना मुळव्याध होण्याची शक्यता वाढते.   मूळव्याधीचा  आजार  मुख्यपणे खाण्यापिण्याच्या सवयीने  होतो. त्यामुळे काळजी घ्या. मूळव्याधीसाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी घेऊ शकता. ओव्याचे हे पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते.  मूळव्याध रुग्णांसाठी ते खास आहे. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म आतड्यांसंबंधी मार्गाची जळजळ कमी करतात आणि आतड्यांसंबंधी हालचाल सुधारतात. यामुळे मूळव्याधीतील बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून काही प्रमाणात आराम मिळू शकतो. मूळव्याधीच्या  समस्येवर भाजलेला ओवा आणि हिंग खाणे प्रभावी ठरते. वास्तविक, ओव्यामध्ये फायबर असते आणि हिंग पाचक एन्झाईम्सला प्रोत्साहन देते. एकत्रितपणे, दोन्ही पचन गती वाढवतात आणि आतड्याची हालचाल सुलभ करतात.  रोज रात्री झोपण्यापूर्वी ओवा पाण्यात भिजत ठेवा.  सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या.

 574 Total Likes and Views

0 Comments

No Comment.