कोरोना गेला, गोवर आला

Analysis
Spread the love

कोरोना व्हायरस थांबला असताना आता गोवरचा धोका वाढतो आहे.  महाराष्ट्र आणि मुंबईच्या काही भागात गोवरची  साथ वेगाने पसरत आहे. २३३ पेशंट  आहेत. अनेक लहान मुलांचा मृत्यू सुद्धा झाला आहे.एकट्या  मुंबईमध्ये १२ जणांचा  बळी गेला आहे.  मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे.

                 गोवर हा एक असा आजार आहे ज्याचे संक्रमण अत्यंत वेगाने पसरते आणि एका वेळेस शेकडो लोकांना कवेत घेऊ शकते. गोवर हा एक संक्रमणयुक्त आजार आहे. जो गोवरच्या व्हायरसमुळे पसरला जातो. जेव्हा कोणी व्यक्ती या व्हायरसमुळे संक्रमित होतो तेव्हा हे संक्रमण खूप दिवस राहू शकते. या दरम्यानच्या काळात ताप येतो आणि शरीरावर चट्टे निर्माण होतात. या खेरीज कानात संक्रमण होणे, हगवण लागणे, न्यूमोनिया असे अनेक आजार देखील उद्भवतात. या आजारावर वेळीच उपचार घेऊन रुग्णाला सुरक्षित करणे महत्त्वाचे असते. अन्यथा रुग्ण दगावण्याची शक्यता असते. बाळाला लहानपणी गोवरची लस दिली जाते. इ त्याची प्रतिकारशक्ती वाढते. मध्यंतरी कमी झालेला हा आजार आता जोर मारतो आहे.

            गोवरचा आजार एका व्हायरसमुळे होतो. गोवरने संक्रमित असणारे लहान बाळ व वृद्ध व्यक्तीच्या नाक आणि घशात हा व्हायरस उत्पन्न होतो आणि यामध्ये इतरांना मोठ्या प्रमाणावर संक्रमित करण्याची क्षमता असते. सोप्प्या शब्दात सांगायचे झाले रुग्ण खोकल्यावर किंवा त्याला शिंक आल्यावर वा तो बोलताना त्याच्या तोंडावाटे हा व्हायरस हवेत पसरतो आणि त्यावेळी जवळपास असणारे जे लोक श्वास घेतात तेव्हा त्या हवेवाटे व्हायरस त्यांच्या शरीरात जाऊन त्यांना संक्रमित करतो.

         गोवर हा आजार म्हणजे एक फ्लू स्ट्रेन आहे. याची लक्षणे सामान्य फ्ल्यू सारखीच असतात. ज्यामध्ये खूप जास्त ताप येतो, थकवा जाणवतो, खूप जास्त खोकला येतो, डोळे अगदी रक्तासारखे लाल लाल होतात. सतत नाक गळत राहते. गोवर आजारात अंगावर चट्टे सुद्धा येतात. जे डोक्यापासून सुरु होतात आणि मग शरीराच्या अन्य भागांमध्ये पसरू लागतात.

 488 Total Likes and Views

0 Comments

No Comment.