करोनाकाळात मोबाईल मुलांच्या हाती गेला. शाळकरी मुलांच्या हाती मोबाईल लागल्याने त्याचे दुष्पपरिणामही समोर येत आहेत. पुण्यातील एका १४ वर्षीय मुलाने स्वत:च्या सोशल मीडियावर आपल्या वर्गातील एका मुलीचा फोटो स्टेटसवर ठेऊन ‘माझी बायको होशील का?,’ असे विचारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाने या मुलीकडे मैत्रीची मागणी केली होती. ‘मैत्री कर नाहीतर तुला उचलून घेऊन जाईल’ असे म्हटलं होतं. मुलीने उत्तर न दिल्याने ‘माझी बायको होशील का?’ असा स्टेटस मुलाने इन्स्टाग्रावर ठेवला होता. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ह्या प्रकरणात लक्ष घातलं आहे.
पोलिसांनी सांगितले की, “दोन्ही मुलं आठवीच्या वर्गात शिकत आहे. मागील एक महिन्यापासून मुलगा ह्या मुलीचा पाठलाग करत होता. ‘तुझा फोटो मुलाने इन्स्टाग्रामवर ठेऊन ‘माझी बायको होशील का’? असं लिह्ल्याचे मैत्रिणीने मुलीला सांगितले तेव्हा ती चक्रावली. तिने हे घरी सांगितले तेव्हा आईने पोलिसात गेली. सध्या मुलाची परिक्षा सुरु आहे. परिक्षा झाल्यावर मुलाला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात येईल,” असे पोलिसांनी सांगितले.
घटना तशी साधी आहे. पण हल्लीची मुलं काय विचार करतात ते सांगणारी आहे. मोबाईल हाती आल्याने अकालीच मुलं वयात येऊ पाहत आहेत. अभ्यास करण्याच्या वयात त्यांना आईपेक्षा बायकोची गरज वाटत आहे. मुलांच्या मनातली ही वादळे आईवडिलांच्या लक्षात येत आहेत का? “पालकांनी आपल्या मुलांचे सोशल मीडियावर खाते आहे का? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपली मुले लॅपटॉप, मोबाईल कशासाठी वापरतात याविषयी पालकांनी जागरुक असलं पाहिजे. त्यांच्या मोबाईलची तपासणी करायला हवी. मुलं कोणत्या जाळ्यात अडकत नाही ना? हे तपासलं पाहिजे. समस्या इथेच सुरु होते. आईवडिलांना तेवढा वेळ आहे का? वेळ नाही म्हणूनच मुलगा असो की मुलगी, घराबाहेर आधार शोधू लागली आहेत.
69 Total Likes and Views