डायबेटीज आहे? पेरू खा

Analysis
Spread the love

हल्ली महागडी फळे खाण्यावर लोकांचा भर दिसतो. खूप सारी विदेशी फळे बाजारात आली आहेत.  काश्मीरमध्ये पिकणाऱ्या सफरचंदापेक्षा  तुमच्या भागात होणारी फळे खा. सध्या थंडीच्या मोसमात तर  बाजारात भरपूर  पेरू आले आहेत. पेरू खा पेरू. अनेक बाबतीत गुणकारी आहे.  स्वस्त आणि मस्त. नव्या संशोधनानुसार पेरू हे फळ मधुमेहाचा विकार असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. नियमित पेरूचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते, असे दिसून आले आहे. 

         पेरूमध्ये  फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पोट साफ करण्यास  मदत होते. पेरू बिया आणि सालीसकट पूर्णपणे खाल्ला पाहिजे. काही जण पेरूची साल काढून खातात, मात्र ते चुकीचे आहे. सकाळी लवकर किंवा जेवणादरम्यान नाश्ता म्हणून तो  खाणे चांगले.  आंबट पदार्थांमुळे सर्दी-खोकला होतो, असा गैरसमज असल्याने पेरूपासून लहान मुलांना दूर ठेवले जाते. मात्र क जीवनसत्त्व आणि लोहाचे प्रमाण अधिक असल्याचे पेरू सर्दी-खोकल्यातही उपयुक्त आहे. पेरू खाल्ल्याने लोहाची कमतरता दिसून येत नाही. आतड्याच्या आरोग्यासाठीही पेरू चांगला  आहे. बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी पेरू खाल्ल्याने मूळव्याधीची लक्षणे दूर होतात.  पेरूमध्ये तांबे व मँगनीज असल्याने हिमोग्लोबिनची पातळी सामान्य राखण्यास आणि थायरॉइडचे कार्य सुधारायला मदत होते. पेरूच्या फळातील पोटॅशियम आणि फायबर घटक रक्तदाब आणि रक्तातील लिपिड्स नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

 561 Total Likes and Views

0 Comments

No Comment.