अलीकडे वादग्रस्त वक्तव्य करण्याची राजकीय नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. ह्या कामी आपणही मागे नाही असे आता योगगुरू रामदेव बाबा यांनीही दाखवून दिले. ‘महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात’ असे रामदेवबाबा ठाणे इथल्या शिबिरात म्हणाले. या वक्तव्यावरून महिला संतापल्या आहेत.
पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन ठाण्यातील हायलँड भागात करण्यात आले होते. बाबा रामदेव यांनी महिलांशी संवाद साधताना हे शब्द वापरले. उपस्थिताना ते खटकले. लगेच कोणी महिला बोलल्या नाहीत. पण आता लोक बोलू लागले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या शिबिराला आल्या होत्या. ‘अमृता फडणवीस आणखी 100 वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत, अशी स्तुतीसुमनं ह्या बाबाने उधळली. अमृता फडणवीस या अनेक वर्षे तरुण राहतील, यामागचं कारणही बाबाने सांगितलं. बाबा म्हणाले, अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रचंड इच्छा आहे. त्या नेहमीच मोजून मापून खातात. खुश राहतात. लहान मुलासारखं हसत असतात… त्यामुळे त्या तरुणच राहतील.’
115 Total Likes and Views