चीनमध्ये पुन्हा वाढला कोरोना, भारताला काळजी

Editorial
Spread the love

भारतात कोरोनाची  प्रकरणं आता जवळपास नसल्यात जमा  आहेत. मात्र, या जीवघेण्या विषाणूनं आपला शेजारी  चीनमध्ये  पुन्हा कहर केलाय. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. एप्रिलनंतर  प्रथमच चीनमध्ये  कोरोनाचे रुग्ण  झपाट्याने वाढत आहेत.  गेल्या चार दिवसापासून रोज ४० हजाराहून अधिक रुग्ण  निघत आहेत.  चीन सरकार सावध झाले असून तिथे अनेक शहरांमध्ये  लॉकडाऊन सुरु झाला आहे. ह्या शिवाय, कोरोनाला रोखण्यासाठी गर्दीवर  नियंत्रण आणले गेले आहे.  थिएटर, जिम बंद  केल्या गेल्या आहेत.

      ओमिक्रोनच्या    bq.1 आणि bq.1.1  ह्या सब-व्हेरीयंटने  चीनमध्ये हा धुमाकूळ चालवला आहे. ह्या प्रकारचा  विषाणू झपाट्याने पसरतो.  ह्या प्रकारच्या विषाणूने भारतातही त्रास दिला होता. तो पुन्हा भारतात  त्रास देऊ शकतो काय?  तज्ञांच्या मते, कोरोनाचे काहीही भाकीत करणे  खरे नाही.   काळजी घेणे हाच एक उपाय आहे.

            भारतात २०२० ची पहिली केस चीनमधून परतलेल्या विद्यार्थ्याची होती. त्यामुळे आता आपले  सरकारही सतर्क झाल्याचं दिसून येत आहे. शेजारच्या चीन आणि इतर काही देशांमध्ये  कोरोना वाढतो आहे. आपल्यासाठीही ही धोक्याची घंटा मानून वागले पाहिजे. भारतात  शनिवारी  कोरोनाचे ३०० रुग्ण  आढळले. २४ तासात  चौघांचा मृत्यू झाला.   हे प्रमाण नगण्य असले तरी  गाफील राहून चालणार नाही. तेव्हा  तुम्ही फेकून दिलेला मास्क  तोंडावर  ठेवणे सुरु करा. कारण शत्रू छुपा आहे.  सांगून हल्ला करीत नाही.

 139 Total Likes and Views

0 Comments

No Comment.