श्रद्धा वालकर हत्या गाजत असतानाच तशीच एक हत्या समोर आली आहे. दिल्लीतील त्रिलोकपुरी येथे ६ महिन्यापूर्वी झालेल्या अंजन दासच्या हत्येचा गुंता दिल्ली पोलिसांनी उकलला आहे. अंजन दासची हत्या केल्यानंतर त्याच्याही मृतदेहाचे श्रद्धाप्रमाणेच तुकडे करण्यात आले. चाकू-सुऱ्याने मृतदेहाचे 10 तुकडे केले. पोलिसांनी 6 तुकडे जप्त केले असून उर्वरित 4 तुकड्यांचा शोध सुरू आहे.
श्रद्धाची हत्या त्याच्या लिव्ह-इन पार्टनरने केली होती. इथे वेगळा मामला आहे. अंजनची वाईट नजर त्याच्या सावत्र मुलाची बायको आणि घटस्फोटित सावत्र मुलीवर पडली होती. त्यामुळे संतप्त पत्नी आणि सावत्र मुलाने मिळून त्याचा गेम केला. हत्येनंतर त्याच्या शरीराचे दहा तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले. पुढे ३-४ दिवस त्यांनी ते दिल्लीच्या विविध भागात फेकले. मासाचे तुकडे मिळाले तेव्हा पोलीसही चक्रावले होते. पण पुढे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस खुन्यांपर्यंत पोचले.
पोलिसांनी सांगितले की, अंजन दास हा मूळ बिहारचा रहिवासी होता. त्याचं तिथे आधीच लग्न झालं होतं. लिफ्ट ऑपरेटर म्हणून तो काम करायचा. एवढंच नाही, तर अंजनला आधीच 8 मुलं होती. पूनम ही त्याची दुसरी पत्नी होती. २०११ मध्ये पूनम अंजनला भेटली होती. ६ वर्षांनी दोघांनी लग्न केले. पूनमसोबत लग्नानंतर त्याने तिचे दागिने विकून पैसे बिहारलाही पाठवले होते. मात्र सावत्र सून (दीपकची बायको) आणि सावत्र मुलगी यांच्यावर वाईट नजर असल्याने अंजनला जीवे ठार मारण्याचा कट रचला गेला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
424 Total Likes and Views