हल्ली लोकांची जीवनशैलीच रोगट झाली आहे. त्यामुळे तब्येत गडबडते. सकाळी लवकर उठणे जमत नाही आणि रात्री उशिरा जेवण आणि त्यामुळे झोपणेही उशिरा होते. सारे आजार ह्या चुकीच्या वेळच्या जेवणाने होत आहेत. पण हे कळते तेव्हा उशीर झालेला असतो. एखादे वेळी जेवणाला उशीर आपले शरीर समजून घेते. पण रोजच उशिरा जेवत असाल तर तुम्ही मोठी चूक करीत आहेत. लक्षात ठेवा. शक्यतो अंधार पडायच्या आत जेवायची सवय लावा. ते शक्य नसेल तर लवकरात लवकर कसे जेवता येईल ते पहा. रात्री ८ वाजल्यानंतर जेवणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये किमान २ तासांचे अंतर असावे.
रात्री जेवण्याच्या तोटेच जास्त आहेत. रात्री उशीरा जेवल्याने वजन वाढू शकते. अनेकांना डाएट करून किंवा नियमित व्यायाम करूनही वजन कमी करण्यात यश मिळत नाही, याचे कारण उशिरा जेवणे असू शकते. रात्री उशीरा जेवल्याने शरीरातील नैसर्गिक पचन प्रक्रियेवर परिणाम होतो. रक्तदाब अनियंत्रित होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे अशा समस्याही उद्भवू शकतात. बद्धकोष्ठता, डोकेदुखी हे आजार उशिरा जेवण्यातून निर्माण होतात. शेवटी सारा खेळ पोटावर आहे. पोट चांगले खेळले तरच तुम्ही आयुष्याचा वर्ल्ड कप जिंकाल.
252 Total Likes and Views