मंत्रांची टिंगल करणाऱ्यांना टोले

Editorial
Spread the love

ब्राम्हणांच्या प्रत्येक गोष्टीची टिंगल उडवण्याचा प्रकार अलीकडे वाढला आहे. ब्राम्हणांशिवाय भागात नाही. मंगल कार्य असो की अंत्यविधी ब्राम्हण लागतोच. पण मिळेल तेव्हा त्यांची  टिंगल उडवण्याचा मोह आवरत नाही. कन्यादानाच्या वेळी भटजी जे मंत्र म्हणतात, त्यावरुन राष्ट्रवादीचे  आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीतील इस्लामपूरमधील सभेत भाष्य केलं होतं. यावेळी मंचावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खदाखदा हसल्याचे व्हिडिओ समोर आले होते. नुकतेच जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने मिटकरींच्या वक्तव्याचा धागा पकडत प्रख्यात अभिनेते आणि शिंदे गटातील नेते शरद पोंक्षे यांनी ह्या दोघांना  टोला लगावला.

        ‘घरातल्या लग्नात मंत्र म्हटले असतील का?’ अशा आशयाची फेसबुक पोस्ट पोंक्षेंनी ह्या दोघांचे नाव न  घेता केली आहे. “बदल स्वागतार्ह. काही दिवसांपूर्वी लग्नातल्या मंत्रांची टिंगल करून खिदळणाऱ्या मंत्र्यांच्या घरातल्या लग्नात मंत्र म्हटले असतील का? मंगलाष्टक म्हणून अक्षता टाकणारे नेते दिसले, म्हणून ही शंका आली” अशा शब्दात शरद पोंक्षे यांनी  टोले लगावले आहेत.             सांगलीतील इस्लामपूरमध्ये झालेल्या सभेत बोलताना  अमोल मिटकरी यांनी एक किस्सा सांगितला होता. “मी एका लग्नाला गेलो, त्यावेळी कन्यादान सुरु होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलंय, नेत्रदान ऐकलंय, रक्तदान ऐकलंय. कन्या हा काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना… नवरदेव पीएचडी, नवरी एमए झालेली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा आणि तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. म्हणा ‘मम भार्या समर्पयामी’ मी नवरदेवाच्या कानात कुजबुजलो, अरे येड्या, ते महाराज म्हणतायत, मम म्हणजे माझी.. भार्या म्हणजे बायको… आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा… आरारारा.. कधी सुधरणार” असे मिटकरी  म्हणाले होते.  त्यांना ह्या पोस्टने उत्तर मिळाले. ‘चांगली जिरवली’ अशा शब्दात लोकांनी पोक्षेंना  दाद दिली.

 124 Total Likes and Views

0 Comments

No Comment.