शिवसेनेतील फुटीने राज्याला एक जबरदस्त वादळ जन्माला घातले. ह्या वादळाचे नाव आहे सुषमा अंधारे. ठाकरे गटाच्या उपनेत्या अंधारे. सध्या क्रेझ असलेल्या नेत्यांमध्ये सुषमा अंधारे आघाडीवर आहेत. सोशल मिडीयावर त्यांचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. अंधारे यांच्या तावडीत सापडलेला नेता चार दिवस पाठ चोळत राहतो. सध्या मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे हे अंधारे यांच्या रडारवर आले आहेत. मुलुंड इथल्या सभेत त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेची जोरदार चर्चा आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो. ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असं करताना ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात. दोनच मुद्दे मांडा, पण व्यवस्थित मांडा ना. मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही थोडं बोलेन, मी मध्येच विचारवंत होईन, मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटर होईन, मध्येच आणखी काही होईन आणि मी काहीतरी बोलेन आणि लोक काहीतरी समजतील, असं यांचं सुरू असतं.”
त्या पुढे म्हणाल्या, “खरंतर मला त्या माणसावर बोलावंसं वाटत नाही. आमचे देवेंद्रभाऊ किती छान बोलतात. मला आमचे देवेंद्रभाऊ आवडतात. कारण त्यांना माझ्यापेक्षा चांगलं सुचतं. ते म्हणाले की, मतदार नसलेली सेना. मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा आणि काय होतं पाहा. मतदारमधील ‘म’, नसलेलीमधील ‘न’ आणि सेनेमधील ‘से’ काढला की काय होतं? मी काहीच म्हणत नाही. मी अतिशय गरीब लेकरू आहे, त्यात अजिबात पडत नाही. आता मतदार नसलेल्या सेनेचा उमेदवार नसलेली सेना इथपर्यंत प्रवास झाला आहे. अशी परिस्थिती होऊनही त्यांना बोलावंसं वाटतं.
117 Total Likes and Views