पुण्यात झिका आजाराचा रुग्ण आढळल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी दिली. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून राज्यात निदान झालेला झिकाचा हा तिसरा रुग्ण आहे. त्यापैकी दोन रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात कामासाठी आलेला हा रुग्ण ६७ वर्षांचा आहे. तो मूळचा नाशिकचा असून पुण्यात कामासाठी आला होता. ताप, सांधेदुखी आणि थकवा जाणवू लागला तेव्हा तपासात त्याला झिका निघाला.
एडीस या डासापासून डेंगी, चिकुनगुणीया आणि झिका या तिन आजारांचा संसर्ग होतो. झिका आजाराची बहुतेक रुग्णांना ठळक लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे त्याचे निदान लवकर होत नाही. पालघर, बेलसर आणि आता पुणे या ठिकाणी झिकाचे रुग्ण आढळल्याने या आजाराचा संसर्ग होत असल्याचे दिसत आहे. पण, त्याच्या संसर्गाचे प्रमाण सौम्य आहे असे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.
162 Total Likes and Views