ऋतुराजचा हंगामा, तरीही हजारे करंडक सौराष्ट्रला

News Sports
Spread the love

ऋतुराज गायकवाडने एकामागून एक शतकं झळकावली, धावांचा डोंगर रचला. पण गायकवाडच्या शतकानंतरही महाराष्ट्राला विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. सौराष्ट्रने यावेळी महाराष्ट्राला पाच गड्यांनी पराभूत केले.

             महाराष्ट्राने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि ऋतुराजने आपल्या शतकाच्या जोरावर संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. ऋतुराजने १३१ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह १०८ धावा केल्या. या स्पर्धेतील ऋतुराजचे हे सलग तिसरे शतक आहे.  या हंगामात ऋतुराजने ५ सामन्यात २२०च्या सरासरीने ६६० धावा केल्या. अंतिम सामन्यात १०८ धावांची खेळी करत ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने रॉबिन उथप्पा आणि अंकित बावने यांना मागे टाकले. ऋतुराजच्या नावावर या स्पर्धेत १२ शतके  झाली आहेत.  ऋतुराजच्या शतकाच्या जोरावर यावेळी महाराष्ट्राच्या संघाला ५० षटकांत ९ बाद २४८ अशी दमदार धावसंख्या उभारता आली. मात्र गोलंदाजीत महाराष्ट्र कमी पडला.               महाराष्ट्राच्या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्रची सुरुवात चांगली झाली.  शेल्डन जॅक्सन आणि हाव्हिक देसाई यांनी यावेळी १२५ धावांची सलामी दिली. जॅक्सन अखेरपर्यंत उभा राहीला आणि त्यामुळेच सौराष्ट्रला विजय हजारे ट्रॉफीचे जेतेपद पटकावता आले.

 200 Total Likes and Views

0 Comments

No Comment.