तुमचा मुलगा मोबाईलवर काय पाहतो? त्याच्या दप्तरात काय काय?

Analysis
Spread the love

करोनाकाळात  पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल दिला.  त्यामागे चांगली भावना होती. पण  त्याच मोबाईलने आता मुलांना गुलाम बनवल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे.  कोवळ्या वयात मुलं-मुली वयात येऊ लागली आहेत. मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळण्यासह सोशल मीडियावर व्हिडीओ पाहण्यात अडकलेल्यांच्या शाळकरी मुलांचं प्रमाण वाढलं आहे, अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. मिसरूड न  फुटलेली मुलं तीन तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ मोबाईलवर घालवत असल्याचं बहुसंख्य पालकांनी सांगितलं आहे. तसेच जवळपास ६२ टक्के पालकांनी १३-१७ वयोगटातील मुलं स्मार्टफोनवर तीन तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ सोशल मीडियावर व्हिडीओ पाहण्यात आणि गेम खेळण्यात अडकल्याची माहिती दिली.

             कोरोना काळात मुलांना मोबाईल देणं त्यांच्या व्यसनाला कारणीभूत ठरलं अशी खंत आज पालक बोलून दाखवतात. ती चिंता साहजिक आहे. पण आजच्या आईवडिलांना आपला मुलगा किंवा मुलगी मोबाईलवर  काय करते?, तिच्या दप्तरात काय काय आहे? याची जाणीव आहे का?  कारण बंगलोरमधल्या एका शाळेला  धक्कादायक अनुभव आला. ह्या शाळेने  मुलांची दप्तरे तपासली तेव्हा  शिक्षक चाट पडले.  त्यांना दप्तरात कंडोम, सिगारेटी आणि बरेच काही मिळाले.  हल्लीची मुले   गरजेपेक्षा अधिकच   वयात आली आहेत.  पुढे जे भोगायचे ते त्यांना  ह्या कोवळ्या वयात  भोगायचे आहे.  बिअरपासून साऱ्याची चव त्यांना चाखायची आहे. त्यातून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पालकांनी मुलांना वेळीच सावरले नाही तर  ही पिढी हातून जाऊ शकते. हा धोका कोणत्या राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर आहे?

 162 Total Likes and Views

0 Comments

No Comment.