आता चेहराच बनेल बोर्डिंग पास

Analysis
Spread the love

            केंद्र सरकारने नुकतेच ‘डिजीयात्रा’ नावाने एक  अॅप सुरू केले आहे. या अॅपचा वापर करत प्रवाशांना आता ओळखपत्रांशिवाय विमानप्रवास करता येणार आहे. या अॅपचा वापर करून चेहऱ्याच्या आधारे प्रवाशांची ओळख पटवत त्यांना प्रवेश दिला जाईल. त्यासाठी विमानतळावर ‘फेशियल रेकग्निशन सिस्टीम’ ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे चेहरा स्कॅन करून प्रवाशांची ओळख पटवण्यात येणार आहे. ‘फेशियल रिकग्निशन सिस्टीम’ ही एक बायोमेट्रिक प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे व्यक्तीचे डोळे, नाक आणि चेहऱ्याच्या आकारावरून त्याची ओळख पटवण्यात येते. आज जगभरातील अनेक विमानतळांवर ही प्रणाली वापरण्यात येत आहे. यामध्ये दुबई, सिंगापूर, अटलांटा, जपान या देशांचा समावेश आहे.

              ‘डिजीयात्रा’ सुविधा वापरण्यासाठी प्रवाशांना सर्वप्रथम ‘डिजीयात्रा’ अॅपवर आधारकार्डाद्वारे नोंदणी करावी लागेल. तसेच स्वत:चा एक फोटो आणि प्रवासाचे तिकीट अॅपवर अपलोड करावे लागेल. त्यानंतर ही संपूर्ण माहिती विमानतळ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल. विमानतळावर प्रवेश करताच प्रवाशांना बारकोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर प्रवेशद्वाराजवळ बसवण्यात आलेल्या ‘फेशियल रेकग्निशन सिस्टीम’द्वारे प्रवाशांचा चेहरा स्कॅन करून त्याची ओळख पटवण्यात येईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना विमानतळाच्या आत प्रवेश मिळेल.

 175 Total Likes and Views

0 Comments

No Comment.