जुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी विवाह

Analysis
Spread the love

कलियुगात उलटे घडतेय. एक लग्न असताना एकाने दुसरीशी लग्न करण्याचे प्रकार कानावर येतात. पण आता जुळ्या बहिणींनी  एकाच मुलाशी विवाह केल्याची जोरदार चर्चा आहे.  सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) इथल्या लग्नाची ही गोष्ट खमंगपणे चघळली  जात आहे.  सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी  या प्रकरणी गुन्हा नोंद्ल्याची माहिती आहे.

         रिंकी आणि पिंकी ह्या दोघीही इंजिनिअर  आहेत. या दोघींचं शिक्षण एकत्रित झालं.  एकाच आयटी कंपनीत नोकरीला देखील लागल्या. लहानपणापासूनच या दोघी एकमेकींसोबत वाढल्या. दोघींनाही एकमेकींची एवढी सवय झाली की त्यांनी एकाच वरास जीवनसाथी म्हणून निवड करून  सप्तपदी घेतली. दोघीही बहीणी आईसोबत राहत होत्या. वडील नाहीत. गेल्या काही दिवसांपूर्वी रिंकी,पिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्या. यावेळी अतुल या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने तिघींनाही रुग्णालयात दाखल केले. यावेळी अतुल याने त्या तिघींचीही सेवा केली. त्यामुळे तिघींनाही अतुलविषयी आपुलकी निर्माण झाली. यातूनच एकीचे अतुलवर प्रेम जडले. परंतु, त्या दोघींनी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या वेगळं होऊन राहू शकत नव्हत्या. त्यामुळे आईच्या आणि अतुल याच्या कुटुंबीयांच्या संमतीने दोघींनीही अतुल याच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. थाटात बार उडाला.  पण हे लग्न कायद्यात बसते का?  त्याचीही  चर्चा  सुरु झाली आहे.

 274 Total Likes and Views

0 Comments

No Comment.