*बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू हे रूढार्थाने झाले. फुलपाखरू हे रूपक वापरून डॉ सुजित पाटील आणि डॉ राजकुमार पाटील यांनी एक सुंदर भावनिक कलाकृती सादर केली आहे. बटरफ्लाय हा सिनेमा मी नुकताच पाहिला. सिनेमाचे कथानक अगदी साधे आहे पण मनाला भिडणारे आहे.*
*कथानक सांगून मी तुमचा सिनेमा पाहण्याचा आनंद हिरावून घेणार नाही. आपल्या अवतीभवती अनेक लोक गरीब परीस्थितीत काबाडकष्ट करून जगत असतात अशा परीस्थितीत प्रत्येक जण आपापल्या परीने आपली छोटी छोटी स्वप्न, अपेक्षा घेऊन जगत असतात. छोट्या छोट्या गोष्टीत आपला आनंद शोधत असतात आणि आपल्या आनंदाच्या स्वप्नपूर्तीसाठी झटत असतात. अडथळ्यांची शर्यत पार करून आनंदाच्या स्थानकावर कशी पोहचतात हे सांगणारी छोटीशी गोष्ट म्हणजे बटरफ्लाय सिनेमा.*
*नंदुरबार मधील सामाजिक जाण असणारा माझा मित्र डॉ राजकुमार पाटील हा निर्माता आणि कलाकाराच्या भुमिकेत अतिशय चपखलपणे रमला आहे. फूटपाथवरील स्वेटर विक्रेत्याच्या भुमिकेत एकदम फीट बसला आहे. नैसर्गिक अभिनय ही त्याची खासीयत राजकुमार ने आणखी विकसित केली पाहिजे ही प्रेक्षक म्हणून अपेक्षा. २० रूपयासाठी एका प्रसंगात प्रतिक्रिया आणखी तिव्र करता येणे शक्य होते. स्वेटर विक्रेत्याच्या भुमिकेला न्याय देण्याचा त्याचा प्रयत्न अभिनंदनास पात्र आहे. बूटपाॅलीशचा व्यवसाय करणारी व्यक्तीरेखा साकार करणार्या पत्रकार रणजीत राजपूत यांनी भुमिकेत जीव ओतून काम केले आहे. विशेषतः मुद्राभिनय उत्तमच. संगीत उत्तमच आहे. बटरफ्लाय सिनेमा चे दिग्दर्शक सन्मित्र डॉ सुजित पाटील आणि संपूर्ण बटरफ्लाय मधील कलाकार, तंत्रज्ञ , संगीतकार आणि संपूर्ण टीम चे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.*
*’बटरफ्लाय’ सिनेमा गरीबी मांडत नाही तर त्या परीस्थितीत माणसाच्या मनाची कुतरओढ कशी होते. परीस्थिती माणसाला हतबल करते पण आपल्या मनातील अपेक्षेच्या बटरफ्लायला प्रामाणिकपणे झेप घेणे देखील शिकवते. सामान्य कष्टकरी माणसं एकमेकांना कसे समजून घेतात याची मांडणी देखील हा सिनेमा सहजपणे करतो. प्रत्येकाने आपल्या स्वप्नांच्या बटरफ्लायला घट्ट धरून ठेवले पाहिजे. योग्य वेळ येताच बटरफ्लाय झेपावते आणि आनंदाची अनुभूती देते. बाकी अगदी वेळात वेळ काढून हा सिनेमा प्रेक्षकांनी पहावा असे मी आवर्जून सांगेन.*
*©️लोकमित्र संजय काशिनाथ सोनटक्के*
*संयोजक : लोकसहजीवन मिशन*
९८२२४६९४९५ | *६ डिसेंबर २०२२*












141 Total Likes and Views