अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वातील आम आदमी पार्टीनं दिल्ली जिंकली. १३४ जागांसह एकहाती सत्ता दिल्ली महापालिकेवर मिळवली आहे. भाजपला १०४ जागा मिळाल्या, काँग्रेसला ९ आणि अपक्षांना तीन जागा मिळाल्या. पण सर्वाधिक चर्चा आहे आपच्या सुलतानपूर माजरा या विधानसभा मतदारसंघातील सुल्तानपुरी वॉर्डमधून बॉबी किन्नर यांच्या विजयाची. बॉबी या दिल्ली महापालिकेच्या पहिल्या तृतीयपंथी नगरसेवक ठरल्या आहेत.
अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी झालेल्या बॉबी यांनी पुढे आम आदमी पक्षात प्रवेश केला. सामाजिक कामात देखील त्या अग्रेसर असतात. बॉबी किन्नर यांनी १५ गरजू मुलींच्या लग्नाचा खर्च देखील केला आहे. याशिवाय त्या हिंदू युवा समाज एकता अवाम दहशतवाद विरोधी समिती, दिल्लीच्या अध्यक्षादेखील आहेत.
आप एका किन्नरला निवडून आणू शकतो. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आपची जादू अजूनही उतरलेली नाही हेच ह्या निकालावरून लक्षात येते. मात्र त्याच वेळी दिल्लीचे निकाल धक्कादायक लागले आहेत. भाजप आणि आप यांच्यात अतिशय चुरशीच्या ह्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष होते. गुजरातची निवडणूक लढतानाच आपने दिल्लीतही मोर्चा सांभाळला हे विशेष. दोन निवडणुकांमुळे आपची ताकद विभागली जाईल असा भाजपचा होरा होता. पण तसे झाले नाही. ३० जागांचे निकाल ४०-५० मतांच्या फरकाने लागले. यावरून निवडणूक किती चुरशीची झाली हे लक्षात येईल. केजरीवाल यांच्यासाठी मात्र परिस्थिती ‘कही ख़ुशी, कही गम’ अशी आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा यावेळी आपची ११ मते कमी झाली आहेत. दोन वर्षात घटलेल्या ह्या मतांनी केजरीवाल यांची चिंता वाढवली आहे. कारण लगेच दोन वर्षांनी लोकसभा निवडणुका आहेत. आणि यावेळी केजरीवाल स्वतःला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून फोकस करू पाहत आहेत.
137 Total Likes and Views