-तर माझी श्रद्धा वाचली असती, बापाचा टाहो

Analysis
Spread the love

अतिशय क्रूरपाने  प्रियकराच्या हातून मारल्या गेलेल्या  श्रद्धाचे वडील  वडील  विकास वालकर यांनी आज उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन  आपबिती सांगितली.  त्या नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वसई येथील तुळींज आणि माणिकपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांवर गंभीर आरोप केले. वालकर म्हणाले, सुरुवातीच्या काळात पोलिसांनी आपल्याला योग्य ते सहकार्य केलं नाही. त्यामुळे आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला. त्याचवेळी पोलिसांनी दखल घेतली असती, तर माझी मुलगी आज जिवंत असती. काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती.

             आम्हाला न्याय मिळेल असा शब्द दिल्ली पोलिसांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. श्रद्धाला अतिशय क्रूरपणे संपवणाऱ्या आफताब पुनावाला कठोर शिक्षा व्हावी. त्याच्या कुटुंबियांची चौकशी व्हावी. ते दोषी आढळल्यास त्यांनाही शासन व्हावं, अशी आशा असल्याचे ते म्हणाले.  दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस संयुक्तपणे गुन्ह्याचा तपास करत आहेत. न्यायालयावर, न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असल्याचं वालकर म्हणाले.

             पालघर येथील रहिवासी असणाऱ्या २७ वर्षीय श्रद्धा वालकरचा  तिचा प्रियकर अफताब पूनावाला याने दिल्लीत  निर्घृण खून केला.  नराधम आरोपीनं श्रद्धाचे मृतदेहाचे ३५ तुकडे करून विविध परिसरात फेकले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अफताब पूनावाला यांस अटक केली असून तो सध्या तिहार तुरुंगात आहे.

 977 Total Likes and Views

0 Comments

No Comment.