वयाने २४ वर्षे लहान पुजाला ‘डेट’ करतोय सलमान खान?

Entertainment News
Spread the love

             बॉलिवूड ‘किंग खान’  सलमान खान पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा नवी नाही. याआधी सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं होतं.  त्या नट्या लग्न करून मोकळ्या झाल्या.  सलमान ५६ वर्षांचा झाला. पण अजून संट्याच आहे. आता तो एका दाक्षिणात्य अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. वयाने २४ वर्ष लहान असलेल्या पूजा हेगडेला सलमान डेट करत असल्याची चर्चा आहे.

              सलमान खानच्या निर्मिती कंपनीकडून आलेली दोन चित्रपटांची ऑफर पूजाने स्वीकारली आहे. त्यामुळेच सलमान खान व पूजा हेगडेच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.  एका ट्वीटने ह्या   बातमीला  खूपच हवा मिळाली.  सलमानच्या घरच्या लोकांनाही ह्यात काही दम वाटत नाही.   त्याच्या चाहत्यांना तर ही एकदम ‘फेकू’ न्यूज वाटते. पण हे बॉलीवूड आहे. इथे काहीही होऊ शकते.  कारण इथे कुणीच  ‘म्हातारा’ नसतो. शिवाय प्रेम आंधळे असते म्हणे. खरं खोटं काहीही असो. पण सलमानने  एकदाचा संसार थाटावा असेच त्याच्या चाहत्यांना वाटते, हे मात्र खरे.

              सलमान आणि पूजा हेगडे सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या  आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान व पूजा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. पूजा ‘सर्कस’ या बॉलिवूड चित्रपटातून येत  आहे.

 183 Total Likes and Views

0 Comments

No Comment.