नागपूर ते पुणे रस्त्याने आता फक्त ६ तासात

Editorial
Spread the love

      अमेरिकेचे रस्ते शिमंत आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत झाला. हाच मंत्र भारतात चालवण्याचे काम सुरु आहे. आपल्याकडचे रस्ते  मोकळे, चिकने  आणि वेगवान होत आहेत. नागपूर ते पुणे रस्ता प्रवास हा सुमारे १७ तासांचा आहे. पण हा प्रवासाचा वेळ केवळ सहा तासांपर्यंत कमी करण्याचा संकल्प केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. यासाठी नव्या महामार्गाची घोषणा त्यांनी केली आहे. त्यानुसार नागपूर ते पुणे केवळ सहा तासांत पोहोचता येणार आहे. नागपूरमध्ये एम्सचे  उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं, या सोहळ्यात ते बोलत होते.

                    गडकरी पुढे म्हणाले, आम्ही औरंगाबादहून पुण्यापर्यंत हायवे बनवत आहोत. लवकरच याच्या कामाला सुरुवात होईल. यामुळे  नागपूरहून पुणे केवळ सहा तासात पोहोचता येईल. आम्ही सहा एक्सप्रेसवे बनवत आहोत. यामध्ये सूरत-चेन्नई महामार्गाचा समावेश आहे.  साऊथकडे जाण्यासाठी मुंबई-पुण्यातून ट्रॅफिक जातं. पण नव्या महामार्गामुळं प्रदुषणापासून या शहरांना मुक्ती मिळणार आहे.

                   त्याचबरोबर सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर-बंगळुरु-त्रिवेंद्रम-चेन्नई-हैदराबाद असाही एक साऊथमध्ये जाणारा मार्ग असणार आहे. तसेच इंदूर-हैदराबाद, हैदराबाद- रायपूर, नागपूर-विजयवाडा, पुणे-बंगळुरु, पुणे-औरंगाबाद हे ७५,००० कोटी रुपयांचे ग्रीन एक्स्प्रेस हायवे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली तयार होणार आहेत.

 124 Total Likes and Views

0 Comments

No Comment.