ओशोंचा मृत्यू हत्या होती की षडयंत्र?

Analysis
Spread the love

आचार्य रजनीश म्हणजे ओशो जिवंत असते तर आज ९१ वर्षांचे असते. तोडफोड अध्यात्म सांगणाऱ्या ह्या ‘सेक्स गुरु’चे १९९० मध्ये  पुण्यातील कम्युनमध्ये निधन झाले. ओशोंच्या जीवन जितकं वादग्रस्त होतं तितकाच त्यांचा मृत्यूसद्धा. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मृत्यू हा एक षडयंत्र होतं, असा आरोप करण्यात आला होता. एवढंच काय तर त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी असाही वारंवार मागणी केली जाते. ओशोंचा मृत्यू हत्या होती की षडयंत्र याविषयी आजही गुढ कायम आहे. ओशो गेले तेव्हा ते फक्त ५८ वर्षांचे होते.   हे वय अचानक जाण्याचे  त्या काळात नव्हते.   आज तरुणांनाही हार्टचे झटके येत आहेत. पण ३० वर्षापूर्वी तशी परिस्थिती नव्हती. त्यामुळेच त्यांचा मृत्यू अचानक कसा झाला याची आजही चर्चा होते.

       ओशोंचा मृत्यू हार्ट अटॅकनी झाल्याचं बोललं जातं. मात्र, त्यांच्या मृत्यूविषयी काही प्रश्न उपस्थित करण्यात आले.  मृत्यूच्या दिवशी  आश्रमात अनेक डॉक्टर असताना डॉ. गोकुळ गोकणी या बाहेरच्या डॉक्टरांना का बोलवण्यात आले?  याच डॉ गोकुळ गोकणी एक धक्कादायक खुलासा केला होता की ओशोंचे जवळचे डॉक्टर देवराज आणि जयेश यांना मृत्यूच्या शेवटच्या वेळी खोलीत बंद ठेवले. सोबतच गोकणी यांना मृत्यूचे  कारण ‘मायोकार्डियल इन्फेक्शन’मुळे झाले असल्याचे सांगण्यात आले होते.

           ‘हू किल्ड ओशो’ या पुस्तकात लेखक अभय वैद्य यांनी ओशोंना मेडिसीनचा ओव्हरडोजमुळे विषबाधा झाल्याचे सांगितले होते. ओशोंच्या मृत्यूनंतर तासाभरातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याने  नाही नाही त्या शंका उपस्थित झाल्या. ओशोंची तबियत जेव्हा खालावली तेव्हा त्यांची आई आश्रमात होती. पण आश्चर्याचं म्हणजे त्यांना काहीही सांगण्यात आलं नाही.

       महापुरुषांचे आयुष्य असेच गूढ असते.  आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण ते हातात येत नाहीत. रजनीश यांचे  खरे नाव  चंद्र मोहन जैन.  ते चांगले  वक्ते होते. पुढे १९७० मध्ये त्यांनी आपणाला ज्ञान मिळाल्याचे  सांगितले. १९७४ मध्ये पुण्यात  आश्रम टाकला आणि जगभर हिट  झाले. आज ओशो हयात असते तर हे जग काही वेगळे असते. कोणी त्यांना घालवले? जगावेगळे बोलणारा माणूस असा अचानक जाऊ शकतो? तुम्हाला काय वाटते?

 504 Total Likes and Views

0 Comments

No Comment.