राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र तरीही त्यांना आणखी १० दिवस तुरुंगाबाहेर येता येणार नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात देशमुख गेली १३ महिने कोठडीत आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांची सुटका होईल असे सर्वांना वाटत होते. त्यांच्या चाहत्यांनी तर जल्लोष केला. सीबीआयला सुप्रीम कोर्टात जायचे असल्याने सुटका लांबली.
अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांचे वकील अनिकेत कदम यांनी युक्तिवादाबद्दल माहिती दिली आहे. कदम म्हणाले, “आम्ही आमच्या युक्तिवादामध्ये त्यांच्या आरोग्याचा मुद्दा मांडला. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत आहे. आम्ही न्यायालयासमोर त्यांच्या तब्येतीबद्दलचे सगळे अहवाल सादर केले. आम्ही या आदेशाला पुढे आव्हान देऊ असं सीबीआयने सांगितलं. त्यानंतर न्यायालयाने त्यांना मंजुरी दिली आणि त्यामुळे आता जामिनाच्या आदेशावर १० दिवसांची स्थगिती आली आहे.
अनिल देशमुख यांना एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर काही वेळातच सीबीआयने निर्णयाला आव्हान दिल्यानं अजून १० दिवस देशमुखांचा मुक्काम कोठडीतच आहे.
148 Total Likes and Views