हृदयविकाराच्या झटक्यानं शाळकरी मुलंही मरताहेत

Analysis
Spread the love

हृदयविकाराच्या झटक्यानं अचानक अनेकाचा मृत्यू होतोय. तुम्ही नुकतेच वाचले असेल. लग्नात नाचताना  हार्टच्या झटक्याने कोसळला आणि मेला.   कोणी चालता चालता कोसळतो आहे.  ह्या प्रकाराने डॉक्टरही हैराण आहेत. पूर्वी एवढे असे होत नव्हते.  का मरताहेत अचानक माणसे?  मोठी माणसे मरणे एकवेळ समजू शकते. पण  शाळकरी मुल? आता मुलांनाही हार्टचा  झटका येऊ लागला आहे.  लहान मुलाच्या आकस्मिक मृत्यूमध्ये हृदयविकाराची लक्षणं पहिल्यांदाच दिसली आहेत. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात एका मुलाचा  अचानक मृत्यू झाला.

             १२ वर्षाचा कोमल शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बसमध्ये चढला. सीटवर बसताच तो अचानक बेशुद्ध पडला. त्यानंतर बस चालकानं शाळेच्या मुख्याध्यापकांना याची माहिती दिली. त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, तो शुद्धीवर न आल्यामुळं चौथी इयत्तेत शिकणाऱ्या मनीषच्या कुटुंबीयांना तात्काळ माहिती देण्यात आली. मुलाला घेऊन व्यवस्थापन आणि कुटुंबीय जिल्हा रुग्णालयात पोहोचलं, तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

     जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. अनिल गोयल यांनी सांगितलं की, हा अकस्मात मृत्यूचा प्रसंग होता, जो मुख्यतः हृदयविकाराच्या झटक्यानं होतो. त्यामुळं मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. एका अभ्यासात असं समोर आलंय की, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना बायोपॅथी म्हणजेच ह्रदयाचा किंवा स्नायूंचा त्रास होतो, त्यामुळं हृदयविकाराचा धोका खूप जास्त असतो. डॉक्टरांचे मत लक्षात घेतले तर  मुलांनाही भविष्यात किती मोठा धोका  आहे  ते लक्षात येते.  कोरोन तर गेला.  पण जाताना आपला घाव  सोडून गेला.

 679 Total Likes and Views

0 Comments

No Comment.