कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे अनेकांच्या मनात एक शंका आली आहे. कोरोनाची आधी घेतलेली लस या नव्या व्हेरिएंटवर किती प्रभावी आहे? याबाबत करण्यात आलेल्या एका अभ्यासात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. सेल होस्ट आणि मायक्रोब जर्नलमधील स्टडीनुसार, BF.7 व्हेरिएंटविरोधात पूर्वी घेतलेल्या लसीला चकमा देत शरिरात घुसून बाधित करण्यास सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. पूर्वीच्या लसीमुळे अनेकांच्या शरिरात अँटीबॉडिज तयार झालेल्या असल्या तरी या व्हेरिएंटची लागण होऊ शकते असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाच्या स्पाइक प्रोटीनमध्ये R346T म्युटेशनामुळे तयार झालेल्या या व्हेरिएंटवर अँटीबॉडीज परिणाम करत नसल्याचेही समोर आले आहे. मागील कोरोनाच्या व्हेरिएंटपेक्षा BF.7 ची R व्हॅल्यू १० ते १८ दरम्यान आहे. याचा अर्थ असा की, BF.7 व्हेरिएंट बाधित व्यक्ती त्याच्या आसपासच्या १० ते १८ लोकांमध्ये संसर्ग पसरवू शकते. नव्या व्हेरिएंटचा R व्हॅल्यू यापूर्वीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केले आहे. कोरोना विषाणूच्या अल्फा व्हेरिएंटची R व्हॅल्यू ४-५ आणि डेल्टा व्हेरियंटची R व्हॅल्यू ६-७ अशी होती. मात्र सरकार अजूनही जुनीच लस टोचत आहे. नवी लस घ्यावी लागेल असे अजून कोणीही म्हटलेले नाही. मग लोकांनी काय करायचे? लशीवर लशी घ्यायच्या का? तज्ञांनी याबाबत शंकासमाधान करावे अशी जनतेची इच्छा आहे.
134 Total Likes and Views