अंबानी दान करणार ३०० किलो सोनं

Hi Special
Spread the love

श्रीमंत लोकांचं सारंच वेगळे असतं.  त्यातही ते श्रीमंत अंबानी घराणे असेल तर बोलायलाच नको.  मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांची ३७ वर्षे वयाची मुलगी इशा अंबानी आज कतार  देशातून भारतामध्ये दाखल झाल्या. त्यासाठी कतारच्या राजाने विशेष विमान दिले होते. त्यातून  आलेल्या ह्या विमानात बाळांकडे लक्ष राहावे यासाठी डॉक्टर, नर्सेस आदी सारा ताफा सोबत आला आहे.   अमेरिकेतील सर्वोत्तम बालरोग तद्न्य डॉक्टर्सपैकी एक असलेले डॉक्टर गिबसनही या विमानामध्ये होते. अंबानींच्या या जुळ्या नातवंडांना अमेरिकेमधून विशेष प्रशिक्षण घेऊन आलेल्या नर्सेस संभाळणार आहेत.

         जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर पती आनंद परिमल यांच्याबरोबर इशा पहिल्यांदाच मायदेशी परतल्या तेव्हा आनंदाने अंबानी कुटुंबाला आकाश ठेंगणे झालं होतं.  देवही  छप्पर फाडून देतो ह्या कुटुंबाला.

                       दोन्ही मुलं एका महिन्याची झाल्यानंतर आज इशा त्यांच्याबरोबर मायदेशी परतल्या असल्याने अंबानी कुटुंबियांनी लेकीच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली आहे. अंबानी आणि परिमल यांची घरांना रोषणाई करण्यात आली आहे. ‘करुणा सिंधू’ आणि ‘अँटेलिया’ची सजावट करण्यात आली आहे.             देशभरातील मोठ्या मंदिरांमधील मान्यवर पुजाऱ्यांना आज इशा आणि  आनंद परिमल यांच्या वरळीमधील घरी या जुळ्या मुलांचं स्वागत करण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. ‘करुणा सिंधू’ या निवासस्थानी धार्मिक सोहळा पार पडणार आहे. अंबानी या निमित्ताने ३०० किलो सोनं दान करणार आहेत. या कार्यक्रमामधील खाद्य पदार्थही फार खास असणार आहेत. जगभरातील वेगवेगळ्या देशांमधून विशेष स्वयंपाक्यांना बोलवण्यात आलं असून विशेष प्रसाद तयार केला जाणार आहे. यासाठी तिरुपती बालाजी मंदिर, नाथद्वारामधील श्रीनाथजी, द्वारकाधीश मंदिरातील प्रसादाप्रमाणे प्रसाद बनवला जाणार आहे.

 113 Total Likes and Views

0 Comments

No Comment.