वाजपेयींची प्रेमकथा

Hi Special
Spread the love

माजी पंतप्रधान  आणि भाजप नेते  अटलबिहारी म्हटले म्हणजे  चेहऱ्यापुढे येतो तो एक उमदा नेता, त्यांचे प्रखर वक्तृत्व, त्यांचा राष्ट्रवाद, त्यांचे राजकारण,  त्यांच्या गाजलेल्या सभा. पण वाजपेई ह्या पलीकडेही होते. कविमनाचे रसिक होते. त्यांनी आयुष्यावर प्रेम केले. पण त्यांची एक प्रेमकथाही आहे. आज त्यांची ९८वि जयंती. त्या निमित्ताने त्यांच्या एक वेगळ्या  अंगाचे हे स्मरण.  १९४०  च्या दशकातील ही लव्हस्टोरी. अटल बिहारी वाजपेयी आणि राजकुमारी हकसर हे ग्वालियरमध्ये विक्टोरिया कॉलेज (आताचं लक्ष्मीबाई कॉलेज) मध्ये  शिकायचे. दोघांमध्ये खूप छान मैत्री होती आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनीही कधी प्रेम व्यक्त केले नाही. पण अखेर एकेदिवशी अटलजींनी हिम्मत दाखवत राजकुमारींना लवलेटर लिहले. पण त्यांच्या लवलेटरवर उत्तर आलं नाही. पण त्यांना काय माहिती होतं की हे लवलेटर दिड दशकानंतर त्यांचं आयुष्यचं बदलून टाकणार. असं म्हणतात की अटलजींनी जे लवलेटर लिहलं होतं ते एका पुस्तकात ठेवून त्यांनी वाचनालयात ठेवले होते. त्याच पुस्तकात राजकुमारी कौल यांनी लवलेटरवर उत्तर लिहलं होतं. पण अटलजींपर्यंत ते पोहचलंच नाही.

                राजकुमारींची अटलजींसोबत लग्न करण्याची इच्छा होती. मात्र त्यांच्या घरुन या लग्नाला नकार होता. कौलच्या साखरपुड्यासाठी जेव्हा ग्वालियरहून  कुटूंब दिल्लीला आलं त्या दरम्यान १९४७  च्या फाळणीमुळे देशात दंगे सुरू होते. राजकुमारींचे वडील काश्मीरी पंडित  गोविंद नारायण हकसर यांनी त्यांचा विवाह काश्मीरी पंडित बृज नारायण कौल यांच्याशी केला. राजकुमारी कौलचे पती बीएन कौल रामजस कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. हा काळ होता, जेव्हा अटलजी राजकारणात सक्रीय होते. लग्नानंतर राजकुमारी कौलचं कुटूंब कॉलेज कॅम्‍पसमध्ये रहायचं. काही वर्षानंतर अविवाहित वाजपेयींनी स्वत:ला राजकारणात पुर्णत: झोकून दिले.  अनेक वर्षानंतर दिल्लीमध्ये वाजपेयींची राजकुमारी कौल यांच्याशी भेट झाली. ६०  च्या दशकातील गोष्ट आहे जेव्हा अटलजी प्रोफेसर कौल यांच्या घरी सतत यायचे. पुढे कौल कुटूंब अटलजींच्या लुटीयंस जोनच्या बंगल्यात राहायला आले.

                     राजकुमारी कौल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की मला आणि अटलजींना कधीच आमच्या नात्याविषयी स्पष्टकरण देण्याची गरज भासली नाही. अटलजींसोबतच्या नात्याला घेऊन मला कधीच नवऱ्यालासुद्धा स्पष्टीकरण देण्याची गरज पडली नाही.  दीनदयाल उपाध्याय यांच्या अचानक निधनानंतर जनसंघाचे अध्यक्षपदासाठी अटलजींचं नाव समोर आलं. त्यावेळी पार्टीत त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले  बलराज मधोक यांनी अटलजींच्या  जीवनशैलीवर आरोप लावले. त्यांचा इशारा थेट राजकुमारी कौलशी असलेल्या नात्यावर होता. पण त्यांच्या आरोपाने काहीही फरक पडला नाही.राजकुमारी  कौलला नेहमीच  अटलजींच्या घरचा सदस्य मानले गेले. त्यांच्या मृत्यूनंतर शोकसंवेदना  लिहताना अटलजींच्या दत्तक मुलीची आई असा उल्लेख कौल यांचा केला होता. कौल जेव्हा अटलजीसोबत रहायला लागल्या तेव्हा त्यांनी कौलच्या दोन्ही मुलींना दत्तक घेतले होते. अटलजींची ही एक अशी प्रेमकहाणी होती जी आजही चर्चेत असते. कौलसाठी ते आयुष्यभर विवाहीत राहिले.

 183 Total Likes and Views

0 Comments

No Comment.