खा. शेवाळे यांचा दावा, संतापल्या रुपाली पाटील, काय भानगड ?

News
Spread the love

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे शिवसेनेच्या रडारवर आले आहेत. दिशा सालियन हिच्या  मृत्यू प्रकरणी  शिंदे सरकारने एसआयटी चौकशी लावल्याचा मामला ताजा असताना  खा. शेवाळे यांचे प्रकरण  शिवसेनेच्या हाती लागले. शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेनं काही महिन्यापूर्वी केलेल्या लैंगिक अत्याचार व मानसिक छळाच्या तक्रारीची दखल घ्यावी व या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेनं केली. शिवसेनेच्या या मागणीनंतर राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. माझा संसार आणि राजकीय आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न आहे. बलात्काराचा आरोप करणाऱ्या  त्या महिलेचे पाकिस्तानाशी संबध असल्याचा खळबळजनक दावाही शेवाळे यांनी केला.

                   शेवाळे यांच्या पत्रकार परिषदेनंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, राहुल शेवाळे स्वत: शेण खातात आणि त्या महिलेचा दाऊदशी संबंध जोडतात. राहुल शेवाळे यांना असं बोलताना लाज वाटली पाहिजे.

         दोन्ही बाजू टोकाच्या भूमिका घेत असल्याने हे प्रज्क्र्ण काय वळण घेते त्याकडे  राज्याचे लक्ष लागले आहे.  शेवाळे यांनी म्हटले की, या महिलेला मी करोना काळात मदत केली होती. मात्र नंतर या महिलेच्या अपेक्षा वाढत गेल्या. या महिलेने नंतर मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. माझा संसार कसा खराब होईल तसेच माझे राजकीय आयुष्य कसे नष्ट होईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेची आई दिल्लीमध्ये कॅब्रे डान्सर होती. त्या महिलेच्या वडिलांचा गुन्हेगारी इतिहास आहे. याबाबत दिल्ली पोलीस ठाण्यात माहिती उपलब्ध आहे. या महिलेचा एक भाऊ तुरुंगात आहे. बलात्कार आणि खून प्रकरणात तो तुरुंगवास भोगत आहे. या महिलेचा दुसरा भाऊ ड्रग्ज तस्करी करतो. या महिलेची बहीण माहीम येथे बार गर्लचं काम करते. माझ्यावर तक्रार करणाऱ्या महिलेच्या पूर्ण कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास आहे. या माहितीला दिल्ली पोलिसांनी दुजोरा दिला आहे,” अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.

                      त्यांनी पुढे सांगितले की, “या महिलेला आर्थिक चणचण भासत होती. त्यामुळे माझ्या दुबईच्या रेहमान या मित्राने मला या महिलेला मदत करण्यास सांगितले होते. ही महिला करोनाकाळात भारतात अडकली होती. त्यामुळे तिला मदत करावी असे मला रेहमानने सांगितले होते. करोना काळात मी अनेकांना मदत केली. त्याचप्रमाणे मी या महिलेलाही मदत केली. मात्र नंतरच्या काळात या महिलेची अपेक्षा वाढत गेली. या महिलेने मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. जेव्हा मी पैसे देण्याचे थांबवले तेव्हा या महिलेने खोटे फोटो दाखवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. सप्टेंबर २०२१ मध्ये तिच्या भावाने एक खून केला. या खुनामागे माझ्याविरोधात तक्रार करणारी महिला आहे, असे खून झालेल्या माणसाच्या पत्नीने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी कोर्टालाही तशी माहिती दिली होती. त्यानंतर ही महिला दुबईला पळून गेली. दुबईतून ट्विटर, इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार करून या महिलेने मला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. मी वांद्रे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. मुंबई पोलीस, दिल्ली पोलिसांनी या फेक अकाऊंटचा तपास केलेला आहे. या तपासानुसार दुबईमधून हे अकाऊंट चालवले जात होते.

“मी दुबई पोलिसातही तक्रार केली होती. दुबई पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास केला होता. या तपासानुसार ही महिला पाकिस्तान एजंटच्या माध्यमातून हे फेक अकाऊंट्स चालवत होती. त्यानंतर दुबई पोलिसांनी या महिलेला अटक केली होती. ही महिला ८२ दिवस तुरुंगात होती. शारजाह आणि युएईच्या कोर्टाने या महिलेला ५० दिरहमचा दंड ठोठावला होता. तसेच या महिलेची देशातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला होता. या निकालानंतर मधल्या काळात ही महिला गायब होती. नंतर अचानक एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा या महिलेने मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली, असा दावा शेवाळे यांनी केला.

                शेवाळे यांच्या  दाव्यावर रुपाली पाटील मात्र संतापल्या. त्या म्हणाल्या,     शेवाळे म्हणतात की या महिलेचा दाऊदशी संबंध आहे. तर मग राहुल शेवाळे आणि या महिलेचे जवळचे संबंध होते. अगदी वरचेवर बोलणं व्हायचं याचा अर्थ राहुल शेवाळे यांनी दाऊदच्या हस्तकाशी संबंध ठेवले आणि तिला देशातील अंतर्गत माहिती पुरवली, असा अर्थ घ्यायचा का?

 195 Total Likes and Views

0 Comments

No Comment.