पुढच्या वर्षी तिसरं महायुद्ध होऊ शकतं, असं भविष्य एका अंध ज्योतिषी महिला बाबा वंगा हिने अनेक वर्षांपूर्वी सांगून ठेवलं आहे. तुम्ही म्हणाल, कोण ही महिला? बाबा वंगा ही एक अंध बल्गेरियन गूढ उपचार करणारी महिला होती. १९९६ मध्ये तिचं निधन झालं. अंध असलेल्या या ज्योतिषी महिलेनं स्वतःच्या मृत्यूची देखील भविष्यवाणी केली होती. बाबा वंगाने १११ वर्षांपूर्वी भविष्याबाबत सांगून ठेवलेल्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळेच या महिला बाबा वंगाच्या भविष्यवाणीकडे जगाचं लक्ष लागलेलं असतं.
बाबा वंगाने २०२३ वर्षाचं भविष्य सांगितलं आहे. यामध्ये अनेक धक्कादायक दावे करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे पुढच्या वर्षी तिसरं महायुद्ध होऊ शकतं, असं सांगितलं आहे. पुढच्या वर्षीसाठी बाबाने अणुहल्ल्याबाबत दावा केलाय. अणुहल्ले होऊ शकतात, त्यामुळे जगात विनाश होऊ शकतो, असं सांगितलंय.
सध्या जगात युद्धाचेच वातावरण आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध पुढच्या वर्षी महायुद्धाचं रुप घेऊ शकतं. काही दिवसात हे युद्ध संपेल असा अंदाज होता. पण आता वर्ष होत आलंय. युद्ध सुरूच आहे. लवकरच अमेरिका ह्या युद्धात युक्रेनच्या बाजूने उतरेल अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे काळजीचे वातावरण आहे. या वेळी तरी बाबा वंगा हिचे भविष्य खोटे ठरो अशी सामान्य माणसाची प्रार्थना आहे. तुम्हाला काय वाटते? काय होईल?
273 Total Likes and Views