लोन फ्रॉड केसमध्ये वेणुगोपाल धूत यांना अटक

News
Spread the love

व्हिडिओकॉनचे सुप्रीमो ७१ वर्षे वयाचे  वेणुगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे. चंदा कोचर यांच्या पाठोपाठ सीबीआयने लोन फ्रॉड केसमध्ये मोठी कारवाई केली आहे. चंदा कोचर या जेव्हा आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ होत्या त्यावेळी ३ हजार २५० कोटींचं कर्ज  नियम डावलून देण्यात आलं होतं. व्हिडीओकॉन ग्रुपला हे कर्ज दिलं गेलं होतं. त्यानंतर  धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांचा आर्थिक फायदा करून दिला असा हा मामला आहे.

             २०२० मध्ये ईडीने या प्रकरणात दीपक कोचर यांना अटक केली होती.  २०१२ मध्ये चंदा कोचर यांच्या नेतृत्वात आयसिआयसिआय बँकेने व्हिडिओकॉन ग्रुपला ३२५० कोटींचं कर्ज दिलं. त्यानंतर वेणुगोपाल धूत प्रमुख असलेल्या सुप्रीम एनर्जीने मेसर्स न्यूपॉवर रिन्यूएबल्सला ६४ कोटींचं कर्ज  दिलं. या कंपनीत दीपक कोचर ५० टक्के भागिदारी होती. त्यामुळे हा सगळा घोटाळा कसा झाला ते समोर आलं.

आयसीआयसीआय ICICI बँक आणि व्हिडिओकॉनचे शेअर होल्डर अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबी यांना पत्र लिहून  वेणुगोपाल धूत यांना आयसिआयसिआय च्या सीईओ आणि एमडी चंदा कोचर यांनी एकमेकांचा कर्ज प्रकरणात कसा फायदा करून दिला या सगळ्या बाबी सविस्तर लिहिल्या होत्या.

             १ मे २००९ ला आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ झाल्यानंतर चंदा कोचर यांनी बँकेचे नियम डावलून व्हिडिओकॉन ग्रुपचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांच्या कंपनीसाठी कर्ज मंजूर केलं होतं. चंदा कोचर या बँकेच्या सीईओ झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षातच म्हणजेच २०११ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आलं होतं. आता हे काळे धंदे उजेडात आल्याने आणि त्यावर  दंडुका चालल्याने   बँक क्षेत्रात  खळबळ आहे.

 132 Total Likes and Views

0 Comments

No Comment.