इंच इंच जागा घेऊ, कर्नाटकविरोधात विधानसभेत एकमताने ठराव मंजूर

Editorial
Spread the love

कर्नाटकमधील ८६५ मराठी भाषिक गावांची इंचन इंच जागा महाराष्ट्राची असून सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभं असल्याचा ठराव विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आला.

          गेल्याच आठवड्यात कर्नाटक सरकारनं सीमाप्रश्नावर एकमतानं ठराव मंजूर केला होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली असताना शिंदे-फडणवीस बोटचेपी भूमिका घेत असल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला. त्यामुळे महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढला. अखेर आज विधिमंडळात बेळगाव सीमा प्रश्नावर ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी सातत्यानं बेळगाव सीमाप्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला जात होता. या प्रश्नावर ठराव आणण्याची मागणी केली जात होती. अखेर आज कर्नाटकच्या भूमिकेचा निषेध करणारा हा ठराव   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला  आणि तो मंजूर  करताना  ह्या प्रश्नावर सारे राजकीय पक्ष एक  आहेत असे दर्शन राज्याला  घडले.

      बेळगाव, कारवार, निपानी, बिदर या शहरांसह सर्वोच्य न्यायालयातील दाव्यातील सर्व गावं कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करण्यात येईल. सनदशीर मार्गानं लढा देण्यात येईल. ८६५ गावातील मराठी भाषिक जनतेसोबत मराराष्ट्र सर्व ताकदीनिशी उभे राहील, अशा आशयाचा हा ठराव एकमतानं मंजूर झाला.

     महाराष्ट्र विधानसभा नियम ११० नुसार कर्नाटकातील मराठी भाषिक (बेळगाव, कारवार, बिदर, बालकी, निपाणी) ८६५ गावातील इंच इंच जागा महाराष्टात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 105 Total Likes and Views

0 Comments

No Comment.