पुणे विमानतळावर करण्यात आलेल्या चाचणीत एक प्रवासी महिला करोना पॉझिटीव्ह आढळून आली. ३२ वर्षे वयाची ही महिला सिंगापूरहून आल्याची माहिती आहे. तिला कोणतंही लक्षण जाणवत नाहीट. तिला सध्या घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
चीनमध्ये करोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील सरकारही अलर्टवर आहे. त्यासाठी सर्व राज्यांना सूचनाही करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विमानतळावर आंतरराष्ट्रीय करोना चाचणी ही अनिवार्य करण्यात आली आहे. त्याच दरम्यान, पुणे विमानतळावर करण्यात आलेल्या चाचणीत ही महिला करोना पॉझिटीव्ह निघाली. तिचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठवण्यात आले आहेत.
62 Total Likes and Views