प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात धाकटी सून येत आहे. त्यांचा धाकटा मुलगा अनंत याच्या लग्नाची सुपारी फुटली आहे. राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरात हा सोहळा पार पडला. अनंत अंबानी यांचे लवकरच राधिका मर्चंट नावाच्या मुलीसोबत लग्न होत आहे. या जोडप्याच्या ‘रोका’ सोहळ्याचे पहिले छायाचित्र समोर आले आहे.
अंबानी आणि मर्चंट कुटुंबाची विशेष मैत्री आहे. अनंत आणि राधिका हेही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अंबानी कुटुंबातील प्रत्येक सोहळ्यात राधिका आवर्जून दिसते. आता लवकरच राधिकाही अंबानी कुटुंबाची धाकटी सून होणार आहे. राधिका ही वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. वीरेन हे एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत. भारतातील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचीही गणना केली जाते. राधिका श्रीमंत घरची असली तरी मेहनती आहे. राधिकाने तिचे शालेय शिक्षण मुंबईत पूर्ण केले, ज्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेली. तिला वाचन, ट्रॅकिंग आणि स्विमिंगची भरपूर आवड आहे. राधिका दिसायला खूप सुंदर आहे. राधिका ही एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहे. जूनमध्ये अंबानी कुटुंबाने राधीकासाठी अरंगेत्रम समारंभ आयोजित केला होता.
103 Total Likes and Views