फुटबॉलचे जादूगर पेले गेले

Sports
Spread the love

फुटबॉलचे जादूगर  ब्राझिलचे पेले गेले. फुटबॉलच्या ह्या देवाने   वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाशी झुंज थांबली. पेले यांनी ब्राझीलला तीन वर्ल्ड कप जिंकून दिले. एकूण १२०० हून अधिक गोल केले. पण फीफाने ७८४ गोलनाच मान्यता दिली. पेले क्रीडा जगतातील पहिले सुपरस्टार होते. त्यांची प्रसिद्धी फक्त ब्राझीलच नव्हे तर संपूर्ण जगभर होती. एडसन अरांतेस डो नासिमेंटो म्हणजेच पेले यांचा जन्म हा १९४० मध्ये झाला. १७ वर्षांचे असताना १९५८ ला आपल्या पहिल्या वर्ल्डकपमध्ये पेले यांनी ब्राझीलची प्रतिमा बदलून टाकली. स्वीडनमधील खेळवलेल्या स्पर्धेत त्यांनी चार सामन्यांमध्ये सहा गोल केले. यापैकी दोन फायनलमध्ये केले होते. यजमान संघावर ब्राझीलला ५ विरुद्ध २ अशा गोलने विजय मिळवून दिला. आणि हा विजयाचा सिलसिला पुढील अनेक वर्षे सुरू राहिला.  मध्यम वर्गातून आलेले पेले यांची लोकप्रियता एवढी होती १९६० च्या दशकात पेले यांचा सामना बघण्यासाठी नायजेरियातील गृहयुद्धात विरोधी गटांनी ४८ तासांसाठी युद्धविराम घोषित केला होता. १९७७ मध्ये ते आशिया दौऱ्यावर असताना ते कोलकात्यातही आले होते.  इडन गार्डनवर जवळपास अर्धा तास फुटबॉल खेळले. त्यावेळी ८ हजार प्रेक्षक उपस्थित होते. २०१८ मध्ये पेले कोलकात्यात आले होते. ही त्यांची शेवटची भेट ठरली. पेले कधी ऑलिम्पिक खेळले नाही. पण पेले यांच्या ८० व्या वाढदिवशी ऑलिम्पिकच्या अध्यक्षांनी त्यांचा ऑलिम्पिक खेळाडू म्हणून उल्लेख केला होता.  पेले पुन्हा होणार याची जगभर हळहळ आहे.फुटबॉलचे जादूगर  ब्राझिलचे पेले गेले. फुटबॉलच्या ह्या देवाने   वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाशी झुंज थांबली. पेले यांनी ब्राझीलला तीन वर्ल्ड कप जिंकून दिले. एकूण १२०० हून अधिक गोल केले. पण फीफाने ७८४ गोलनाच मान्यता दिली. पेले क्रीडा जगतातील पहिले सुपरस्टार होते. त्यांची प्रसिद्धी फक्त ब्राझीलच नव्हे तर संपूर्ण जगभर होती. एडसन अरांतेस डो नासिमेंटो म्हणजेच पेले यांचा जन्म हा १९४० मध्ये झाला. १७ वर्षांचे असताना १९५८ ला आपल्या पहिल्या वर्ल्डकपमध्ये पेले यांनी ब्राझीलची प्रतिमा बदलून टाकली. स्वीडनमधील खेळवलेल्या स्पर्धेत त्यांनी चार सामन्यांमध्ये सहा गोल केले. यापैकी दोन फायनलमध्ये केले होते. यजमान संघावर ब्राझीलला ५ विरुद्ध २ अशा गोलने विजय मिळवून दिला. आणि हा विजयाचा सिलसिला पुढील अनेक वर्षे सुरू राहिला.  मध्यम वर्गातून आलेले पेले यांची लोकप्रियता एवढी होती १९६० च्या दशकात पेले यांचा सामना बघण्यासाठी नायजेरियातील गृहयुद्धात विरोधी गटांनी ४८ तासांसाठी युद्धविराम घोषित केला होता. १९७७ मध्ये ते आशिया दौऱ्यावर असताना ते कोलकात्यातही आले होते.  इडन गार्डनवर जवळपास अर्धा तास फुटबॉल खेळले. त्यावेळी ८ हजार प्रेक्षक उपस्थित होते. २०१८ मध्ये पेले कोलकात्यात आले होते. ही त्यांची शेवटची भेट ठरली. पेले कधी ऑलिम्पिक खेळले नाही. पण पेले यांच्या ८० व्या वाढदिवशी ऑलिम्पिकच्या अध्यक्षांनी त्यांचा ऑलिम्पिक खेळाडू म्हणून उल्लेख केला होता.  पेले पुन्हा होणार याची जगभर हळहळ आहे.

 116 Total Likes and Views

0 Comments

No Comment.