भारतीय क्रिकेटपटू स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत आज पहाटेच्या कार अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला डेहराडून मॅक्समध्ये दाखल करण्यात आले आहे. आता तिथून त्याला दिल्लीमध्ये आणले जात आहे. अपघात इतका भीषण होता त्याची मर्सिडीज कार पूर्ण जळाली. दिल्ली-डेहराडून महामार्गावर रुरकीजवळ पोहोचला तेव्हा त्याची कार डिव्हायडरला धडकली. या धडकेनंतर कार उलटली आणि आग लागली. पंतला कसेबसे गाडीतून बाहेर काढण्यात आले आणि त्याचा जीव वाचला. मात्र त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या डोक्यात, पायावर, हाताला आणि कमरेला खोल जखमा झाल्या असून, त्याचा पायही मोडला आहे.
ऋषभ पंत एकटाच गाडी चालवत होता, त्याच्यासोबत कोणीही नव्हते. गाडी चालवताना त्याला डुलकी आली असावी आणि त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले. कारने ज्या पद्धतीने खांब व डिव्हायडर तोडले आहेत, ते पाहता त्यांची गाडी ८० ते १०० कि.मी. प्रतितास या वेगाने गेली असावी. सुदैवाने, पंत बीएमडब्ल्यू कार चालवत होता, जी एक मजबूत कार मानली जाते, अन्यथा त्याच्या कारचा अपघात पाहता जीव वाचवणे फार कठीण झाले असते.
137 Total Likes and Views