दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने लेखी परीक्षेसाठी अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा येत्या २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ या काळात होईल, तर दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडेल. यंदा परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमांवर होणार आहेत. ज्यादाचा वेळ मिळणार नाही. करोनापूर्वी जशा परीक्षा होत होत्या तशाच परीक्षा होणार आहेत.
करोना प्रादुर्भावामुळे २०२१ ची दहावी, बारावी परीक्षा झाली नव्हती. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापन गुणदान करण्यात आले होते. २०२२ मध्ये करोनाचा प्रादुर्भाव कायम होता. परीक्षा घेण्यात आली, परंतु शाळा तेथे केंद्र, २५ टक्के अभ्यासक्रम कमी, अधिकचा वेळ असे बदल मंडळाने केले होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २०२३ ची परीक्षा २०२० मध्ये झाली त्याप्रमाणे घेण्यासाठी मंडळाने तयारी केली आहे. शाळा तेथे परीक्षा केंद्र नसणार.
172 Total Likes and Views