दोन बायका, तंटा ऐका

Entertainment
Spread the love

बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद तिच्या ऑफबीट ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. ती नेहमीच रंगीबेरंगी आणि चित्रविचित्र फॅशनचे कपडे घालून रस्त्यावर फिरत असते. ती कधी कोणती फॅशन करेल हे सांगता येत नाही. उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते. पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत बनवलेल्या ड्रेसमध्ये लोकांनी तिला पाहिले आहे. उर्फीला यासाठी अनेकदा ट्रोलही करण्यात आले आहे. मात्र, उर्फीला याचा काही फरक पडत नाही.

                  आता हेच पाहा ना. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचा एक व्हिडीओ शेअर करत ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये चित्रा वाघ म्हणतात, “श्शीSSS…अरे हे काय चाललंय मुंबईत? रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला, मुली विकृतांच्या शिकार होतायत तर ही बया अजून विकृती पसरवतीये.”

              त्यामूळं आता उर्फीचं काही खरं नाही. तिच्यावर कायदेशीर कारवाई होइलं असं वाटतं होतं. यावर उर्फीनं काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र तिने तिचा एक नवीन व्हिडिओ पोस्ट करून  प्रतिउत्तर दिलयं. तिच्या लेटेस्ट लूकमध्ये उर्फीने नखांनी ड्रेस बनवला आहे. तिने गुलाबी रंगाच्या नकली नखांचा वापर करुन ड्रेस तयार केलाय. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतं आहे. दोन वाघिणींच्या  ह्या तंट्यात पोलीस काय करतात ते पहायचे.  पण दोन  बायकांच्या ह्या तंट्यात पुरुष वर्ग  जाम मजा घेत आहे.

 145 Total Likes and Views

0 Comments

No Comment.