वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सतत चर्चेत राहिलेल्या केतकी चितळे हिचा एक ताजा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. केतकी चितळेने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्री इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत तिने तिच्या हातावर गोंदलेला एक टॅटू शेअर केला होता. त्याबरोबरच तिच्या हातात दारुचा एक ग्लासही पाहायला मिळत होता. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये असंही लिहिलं की, “मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है।”.
तिच्या हातातील दारुचा ग्लास पाहून नेटकरी संतापणारच. तसेच झालेही. केतकीचा हा व्हिडीओ पाहून एक नेटकरी म्हणाला, “वाह दीदी… लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका… आणि आपण ढोसायचं..”! त्याची ही कमेंट पाहून केतकी चितळे चांगलीच संतापली. तिने सडेतोड शब्दात उत्तर दिले आहे. ती म्हणते, सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देवही दारू पितात. काली मातेला तर दारूचा नैवेद्य असतो. तसेच काही शंकराच्या मंदिरातही. स्वतः ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते व सांगते. फरक शिका”, असे केतकी चितळेने म्हटले आहे.
एकाने तर जोरदार कमेंट केली आहे. तो म्हणतो, “तुम्ही काही ही करा.. दारू प्या नाहीतर.. फादरांच्या धर्मात जा पण त्याचे असे जाहीर प्रदर्शन करून हा कू संदेश समाजात फैलावू नका.. लोकानी आपला आदर्श घ्यायला सुरु केला होता.. पण त्यावर तुम्ही दारू ओतली.. जरा प्रसिद्ध झाले की Tv सिनेमावाल्या लोकांना हे इसाई धर्म प्रचारक लगेंच गाठतात.. आणि मग फंडिंग टूलकीटने अगदी अशाच पोस्ट टाकल्या जातात.. त्यात एक वाक्य सुरुवातीला हमखास असते.. ख्रिस्ती टूलकीट ओळखू येऊ नये म्हणून.. ते असे ” मी कट्टर हिंदू आहे.. पण हे देखील(इसाई संस्कार )चांगले आहे.. ” बरोबर? लगेंच Unfollow करीत आहे धन्यवाद.”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. त्यावर केतकीने “अनफॉलो केल्याबद्दल धन्यवाद, पोस्ट न कळणारे महामूर्ख लोकं नकोच फॉलोअर्स म्हणून”, असे म्हटले आहे.
केतकीला असे पंगे घेण्याची खोड आहे असे दिसते. याधीही यासाठी तिने सोसले आहे. आताही ही पोस्ट तिला अडचणीत आणि शकते.
397 Total Likes and Views