येतोय अमृता फडणवीस यांचा बल्ले बल्ले डान्स

Entertainment News
Spread the love

मराठमोळ्या अमृता फडणवीस म्हणजे उत्साहाचा धबधबा. भाजप नेते  देवेंद्र फडणवीस यांच्या त्या पत्नी आहेत.  नोकरीही करतात. पण म्हणून त्यांच्या उत्साहाला थकवा येत नाही.  गाणे गाणे आणि नृत्याचा त्यांना छंद आहे आणि तो त्या  मनमुराद पुरवत आहेत. नववर्षातल्या त्यांच्या  एका  ताज्या ट्वीटमुळे चाहत्यांमध्ये उत्साह आहे. काही पंजाबी ओळींसह अमृता फडणवीसांनी केलेलं हे ट्वीट चाहत्यांची उत्सुकता ताणणारं ठरत  आहे.

       ह्या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. हे गाणं पंजाबीत आहे. सोबतच त्यांनी आपला वेस्टर्न ड्रेसमधला एक फोटोही शेअर केला आहे. “अज मैं मूड बणा लेया ए ए ए ,तेरे नाल ही नचणा वे”, असे या गाण्याचे बोल असतील. ६ जानेवारीला हे गाणं रिलिज होणार आहे, असंही त्यांनी  जाहीर केलं आहे.

 176 Total Likes and Views

0 Comments

No Comment.