मॉडेल-अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या चित्र-विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. त्यावरून उर्फी आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. उर्फी जावेदनंही त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. “असा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. मला जर ती कुठे भेटली तर मी तिला थोबडवून काढेन” असा धमकीवजा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. चित्रा वाघ यांच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या वादात उडी घेतली आहे.
सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि केतकी चितळे यांचे अर्धवट कपड्यातील फोटो शेअर करत चित्रा वाघ यांना खोचक सवाल विचारला आहे. उर्फी जावेदच्या वेशभूषेवर तुमचा आक्षेप असेल तर असाच आक्षेप तुम्ही कंगना राणौत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेणार का? यांनाही तुम्ही मारहाणीची भाषा वापराल का? असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला आहे. त्यांनी फेसबूकवर अमृता फडणवीस यांच्यासह कंगना राणौत आणि केतकी चितळे यांचे अर्धवट कपड्यातील फोटो शेअर करत हा सवाल विचारला आहे. यामध्ये त्यांनी अमृता फडणवीसांचा स्विमिंग पूलमधील एक फोटोही शेअर केला आहे.
नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल ? असा सवाल अंधारे यांनी केला आहे.
“अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया. पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?” असा सवालही त्यांनी केला आहे.
दोन महिलांच्या ह्या वादात तिसरीने उडी घेतल्याने हे भांडण काय वळण घेते त्याकडे राज्याचे लक्ष आहे.
126 Total Likes and Views