छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार चांगलेच अडचणीत आले आहेत. भाजपने त्यांच्या विरोधात आंदोलनं चालवली आहेत. दोन दिवस अजितदादा गप्प होते. पण आता त्यांनी मौन तोडले. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मी काहीच चुकीच बोललो नाही. या वेळी अजित पवार यांना पत्रकाराने एक प्रश्न केला की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही ‘जाणता राजा’ म्हणतात यावर भाजप आक्षेप घेतो. त्यावर दादांनी मिष्किलपणे उत्तर दिलं. दादा म्हणाले की, आता मी म्हटलं का, माझ्या काकाला जाणता राजा म्हणा? काय बोलतो राव. ज्यांनी तो शब्द प्रयोग केला त्याला जाऊन विचारा.
अजितदादा म्हणाले, मी कधीच महापुरुषांबाबात चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही. मला विरोधीपक्ष नेते हे पद राष्ट्रवादीने दिलेलं आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई कधी होणार?
दादा पुढे म्हणाले, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो. स्वराज्याच्या रक्षणात सर्व काही आलं. स्वराज्यरक्षक म्हणणं हेच संभाजी महाराज यांना न्याय देणार. द्वेषाचं राजकारण मला मान्य नाही. सूडबुद्धीने राजकारण केलं जात आहे. इतिहासाच्या आधारावर विधानसभेत बोललो. संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षकच म्हणायला हवं. मी माझी भूमिका मांडली. ज्यांना योग्य वाटलं त्यांनी स्विकारावं. कुणी धर्मवीर म्हणेल तर तो त्यांचा प्रश्न. स्वराज्यात सगळ्या जाती धर्माचे लोकं. अनेकांनी स्वतःला धर्मवीर म्हणून घेतलं असा टोमणा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
91 Total Likes and Views