सिनेनटी रेखा आज ६८ वर्षांची आहे. वाढत्या वयासह चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, वजन वाढणे, वेगवेगळे आजार, थकवा हे सर्व ण बोलावता येते. मात्र रेखा याला अपवाद आहे. ह्या वयातही तिचा फिटनेस तरुणींना लाजवणारा आहे. तिला हे कसे जमते?
हे सहजासहजी जमलेले नाही. तिची मेहनत आहे, संयम आहे. सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे हा दिनक्रम रेखाने कायम पाळला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेखा संध्याकाळी ७ ते ७.३० दरम्यान जेवते आणि त्यानंतर ती काहीही खात नाही. त्यामुळेच ती रात्रीच्या पार्ट्यांना दिसत नाही. रेखाचे केस आजही तितकेच सुंदर, काळेभोर, कुरळे आणि लांबसडक आहेत. केसांची काळजी घेण्यासाठी रेखा बेसनाचा वापर करते. बेसनमध्ये दही मिक्स करून हेअरमास्क तयार करण्यात येतो आणि रेखा आठवड्यातून कमीत कमी ४ वेळा केसांना हा हेअरमास्क लावते असं तिने एकदा सांगितलं होतं. बाहेरील खाण्यापेक्षा घरातील जेवणाला रेखा अधिक प्राधान्य देते. सात्विक आणि पौष्टिक जेवण आणि रोजच्या जेवणात दह्याचा समावेश. तसंच फास्ट फूड, जंक फूड, तळलेले आणि मसालेदार खाणे रेखा टाळते. भारतीय पद्धतीने बनलेल्या हिरव्या भाज्या आणि हंगामी फळ खाते. यामुळे चेहऱ्यावरील डेड सेल्स निघून जातात आणि त्वचा अधिक कोमल आणि आकर्षक दिसते. रेखा नेहमी भरपूर पाणी पिते. आहारात साधे पाणी, हंगामी फळांचा रस, नारळाचे पाणी, भाज्यांचे सूप हा तिचा फंडा आहे.
व्यायामाशिवाय तिचा दिवस सुरु होत नाही. रेखा नियमित स्वरूपात योगा, व्यायाम, कार्डिओ व्यायाम, ध्यानधारणा करते, ज्यामुळे शरीराचा फिटनेस चांगला राखण्यास मदत मिळते. नियमित व्यायाम करणे हा रेखाचा दिनक्रम आहे. योग आणि व्यायाम करणे हे सर्वांसाठी सध्या गरजेचे आहे. आनंदी राहता आले पाहिजे. नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आणि मनात शांतता ठेवणे हे सर्वात जास्त गरजेचे आहे. त्यासाठी रेखा ध्यानधारणा करते. सिनेमाच्या पडद्यावरील रेखा तुम्ही पाहिली आहे. पण ती फिल्मी नाही. इतके सारे पथ्यपाणी करते तेव्हा तुम्हाला रेखा दिसते. फिट आणि फाईन.
165 Total Likes and Views