नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी

Editorial
Spread the love

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना  आज धमकीचा फोन आल्याने  खळबळ  आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने जीवे मारण्याची धमकी त्यांना आलेली आहे. ‘आम्हाला खंडणी द्या नाहीतर तुमच्या जीवाचं काही खरं नाही,’ असं फोनवरुन सांगण्यात आलं.  थेट मंत्र्याला धमकीचा फोन आल्याने खळबळ आहे.  गडकरी यांना तशीही झेड प्लस सेक्युरिटी आहे. मात्र पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांची सेक्युरिटी वाढवण्यात आली आहे.  गडकरी तसेही दबंग  नेतृत्व आहे.  धमकीच्या फोनच्या बातमीने   त्यांचे  चाहते काळजीत असताना गडकरी नागपुरात आधीच ठरलेले कार्यक्रम पूर्ण करण्यात दंग होते.

                 गडकरींच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात धमकीचा हा  फोन आला. नागपूरमधील ऑरेंज सिटी रुग्णालयाजवळ नितीन गडकरी यांचं संपर्क कार्यालय आहे. आज सकाळपासून तीन वेळा गडकरी यांच्या कार्यालयात दाऊदच्या नावाने फोन आले. साडे अकरा वाजता दोन फोन आणि १२ वाजून ३२ मिनिटांनी गडकरींना जीवे मारण्याची धमकी संबंधित फोनमधून देण्यात आली. यावेळी फोन करणाऱ्याने खंडणीची मागणी केली. गडकरींच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार फोन करणारा व्यक्ती खंडणीची मागणी करत होता. जर खंडणी दिली नाही तर गडकरींना जिवानिशी मारु, अशी धमकी सदर व्यक्तीने फोनवरुन दिली. यावेळी त्याने दाऊदचं नाव घेतलं.              नागपूरच्या सायबर सेलने तत्काळ तपासही सुरु केला आहे. कॉल नेमके कुठून आले होते, कॉल करणाऱ्याचा उद्देश नेमका काय होता, याचा तपास सायबर पोलीस करत आहेत. धमकीचा फोन  कर्नाटकातून   आल्याची  ताजी माहिती आहे.

 89 Total Likes and Views

0 Comments

No Comment.