रिझर्व्ह बँकेने सेव्हिंग अकाउंटशी संबंधित नियम बदलले आहेत. बँकेने या बाबत काही सूचनां केल्या आहेत. ज्या बँक खातेदारांनी आधीच आपले KYC डॉक्युमेंट सादर केले आहेत आणि त्यांच्या पत्त्यात कोणताही बदल झालेला नाही अशा लोकांना तपशील अपडेट करण्याची गरज असणार नाही. खातेदाराच्या KyC च्या माहितीत जर कोणताही बदल झाला नाही, तर त्या खातेदाराला त्याचा एक ईमेल आयडी, रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक, एटीएम किंवा अन्य डिजिटल माध्यमातून सेल्फ डिक्लेरेशन लेटर्स सादर करता येतील, असे बँकेने स्पष्ट केले आहे. केवायसीसंदर्भातील माहितीत जर कोणताही बदल झाला नाही, तर पुन्हा केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकाचे सेल्फ डिक्लेरेशन आता पुरेसे ठरणार आहे. बँकेच्या शाखांनी ग्राहकांना नोंदणीकृत ईमेल आयडी, नंबर, एटीएम इत्यादींद्वारे स्वयंघोषणा करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. असे केल्याने त्यांना बँक शाखेत जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही आरबीआयने म्हटले आहे.
आता खातेधारकाला त्याचे KYC अपडेट ऑनलाइनदेखील करता येणार आहेत.
117 Total Likes and Views