आईला वाचवण्यासाठी राखी करतेय जीवाचे रान

Entertainment News
Spread the love

       ड्रामा क्विन म्हणून ओळखली जाणाऱ्या  राखी सावंतच्या आयूष्यात सध्या चांगलीच उलथापालथ सुरु आहे. ऐकिकडे आईची प्रकृती दुसरीकडे लग्नाचा ड्रामा. तो संपत नाही तोवर आता तिच्या जिवनात शर्लिन चोप्रा नावाची एक नवीन समस्या आली. मॉडेल व अभिनेत्री शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी तिला  अटक करण्यात आली. राखीची पोलीस ठाण्यात अनेक तास चौकशी करण्यात आली, त्यानंतर रात्री उशीरा सोडण्यात आलं.

      लगेच तर ती  बोलली नाही. मात्र तिने एक पोस्ट केलीय. तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांचा फोटो पोस्ट केलाय,ज्यावर लिहिलयं की, “जगातील सगळ्यात महाग द्रव्य हे अश्रू आहेत. कारण अश्रूंमध्ये १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावना असतात. कोणालाही दुखवण्या अगोदर आधी दोनदा विचार करा.”

               राखी नटी आहे, मॉडेल आहे. पण कमालीची सेन्सिटिव्ह आहे. खास करून आपल्या आईबद्दल.   राखीच्या आईचे मूळ नाव जया भेडा. राखीच्या आईने पहिला संसार मोडल्यानंतर सावंत नामक एका पोलिस कॉन्स्टेबलशी लग्न केलं आणि त्या सावंत झाल्या. सध्या त्या एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. राखीच्या आईला सुरवातीला पोटाचा कर्करोग झाला आणि उपचार सुरू असतानाच  ब्रेन ट्यूमर लक्षात आला. सध्या हा कर्करोग राखीच्या आईच्या संपूर्ण शरीरभर पसरत चालला आहे. त्यांच्या लिव्हर, लंग्ज यासह मेंदूपर्यंत पोहोचला आहे.  डॉक्टर प्रयत्न करत असले तरी प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी आधीच सांगितले आहे. त्यामुळे आपल्या आईला वाचवण्यासाठी राखी जीवाचं रान करून पैसे जमवत आहे.

 126 Total Likes and Views

0 Comments

No Comment.