अधिकाऱ्यांचे दोन प्रकार असतात. एक कामाचा भुकेला असतो. दुसरा कामचुकार असतो. हा दुसऱ्या अधिकारी-कर्मचारी सर्वांना प्रिय असतो. कामच नाही म्हटल्यावर पैसे काह्ण्याचा प्रश्नच नाही, म्हणजे कोणाची तक्रारही नाही. हरयाणातील पहिल्या प्रकारातले ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी अशोक खेमका पहिल्या प्रकारातले आहेत. मला कामच नाही, काम द्या असे ते म्हणतात. मुख्यमंत्री खट्टर यांना पत्र लिहून त्यांनी काम मागितले आहे. खेमका यांनी त्यांना रोजच्या ८ मिनिटांच्या कामासाठी वर्षाला ४० लाख रुपये पगार मिळत असल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ते म्हणतात, अभिलेख विभागात मला आठवड्यातून केवळ एक तासाचं काम आहे. दुसरीकडे इतर विभागांमध्ये काही अधिकार्यांवर अधिकच्या कामाचा भार आहे. अशा एकतर्फी कामाच्या वितरणाने सार्वजनिक हित साधलं जाणार नाही. प्रत्येक अधिकाऱ्याची सचोटी, योग्यता आणि बुद्धीमत्ता लक्षात घेऊन काम दिलं पाहिजे.
सारे मंत्रिमंडळ खेमका यांच्या कामाचे प्रशंसक आहेत. असं असलं तरी ९ जानेवारीला खेमकांची चौथ्यांदा अभिलेख विभागात बदली झाली. अशी बदली होणारे ते एकमेव आयएएस अधिकारी आहेत. खेमका १९९१ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल ५५ वेळा त्यांची बदली झाली आहे. आताही हरियाणा सरकारने त्यांची अचानक बदली केली. पुढच्या वर्षी २०२५ मध्ये सेवेतून निवृत्त होणार आहेत. खेमका म्हणजे आपल्याकडचे तुकाराम मुंडे. त्यांच्याही अशाच बदल्या झाल्या आहेत. मुंडे, खेमका जागोजागी आहेत आणि म्हणूनच नोकरशाही थोडी तरी जिवंत दिसते.
120 Total Likes and Views