माणसाप्रमाणे गाण्यालाही आयुष्य असते. कोणी माणूस १०० वर्षे जगतो तर कोणी तिशीतच निरोप घेतो. तसेच गाण्याचे आहे. काही गाणी अजरामर आहेत तर काही गाणी काही तासातच मरतात. लता मंगेशकरांनी गायलेले ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणे आजही ऐकले तरी रक्त सळसळते. देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरलेले हे गाणे लतादीदीने सर्वप्रथम २७ जानेवारी १९६३ रोजी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर गायले होते. हे गाणे ऐकून जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यात पाणी आले होते. एवढा कणखर नेता, नुसत्या गाण्याने विरघळला.
या वर्षीही ते गाणे वाजले. पुन्हा काही हजार लोक रडले असतील, लाखो तरुणांच्या रोमारोमात रोमांच उभे झाले असेल. ६० वर्षे उलटूनही या गाण्याची जादू आजही तेवढीच आहे, एखाद्या देशभक्ताच्या डोळ्यात पाणी आणण्याची ताकद या गाण्यात आहे. कवी प्रदीप यांनी हे गाणी लिहिले आणि संगीत होते सि. रामचंद्र यांचे. आणि हे तुम्हाला माहित नसेल. प्रदीप यांना गाणे स्फुरले तेव्हा त्यांच्याकडे कागद, पेन्सिल काहीही नव्हते. रस्त्यावरून उचललेल्या सिगारेट पाकिटाच्या कागदावर हे गाणे लिहिले गेले. …
142 Total Likes and Views