एमपीएससीचे परीक्षांसंदर्भातील नवे नियम २०२५ पासून, मुलांचा जल्लोष

Analysis
Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. एमपीएससीचे परीक्षांसंदर्भातील नवे नियम २०२५ पासून लागू होणार आहेत. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश मिळाले आहे.

            UPSC प्रमाणे आता MPSC ला देखील वर्णनात्मक पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. मात्र, हा पॅटर्न २०२३ नव्हे तर २०२५ पासून लागू करावा यासाठी हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला होता. आज हे आंदोलन चालू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी  फोनवरुन संवाद साधला.  त्यानंतर काही तासातच शिंदे – फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांना  मोठा दिलासा दिला.

     सकाळच्या मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली.यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या निर्णयाला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. एमपीएससीला राज्य सरकारतर्फे विनंती करण्यात येणार आहे.  यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

 329 Total Likes and Views

0 Comments

No Comment.