गौतम अदानी यांची लव्ह स्टोरी

Analysis
Spread the love

गौतम अदानी हे नाव सध्या खूप चर्चेत  आहे.  श्रीमंतीसाठी ओळखला जाणारा  हा उद्योगपती आता खुप्प वादग्रस्त झाला आहे.  त्यामुळे की काय जगातील पहिल्या सर्वात १०  श्रीमंतांच्या यादीतून फेकल्या गेला आहे. त्यांच्या  व्यवसायाच्या भानगडी बाजूला ठेवल्या तर  एक माणूस म्हणून  अदानी यांची जीवनशैली अतिशय साधी आहे.  सुखी संसार आहे.  त्यांची पत्नी दातांची डॉक्टर आहे.

        आर एन भास्कर यांच्या पुस्तकात गौतम अदानी आणि त्यांची पत्नी प्रीती अदानीच्या लव्हस्टोरीरीविषयी सांगितले आहे.  प्रीती अदानी यांना गौतम अदानी पहिल्या भेटीत आवडले नव्हते. प्रीतीचे वडील सेवंतीलाल यांना मात्र  गौतम अदानी आवडले होते. त्यावेळी अदानींनी ग्रॅजुएशनसुद्धा पुर्ण केले नव्हते तर प्रीती या डेंटीस्टचा कोर्स करत होत्या. प्रीतीचे वडील सेवंतीलाल यांनी प्रीतीला समजावले की व्यक्तीचे कौशल्य पाहावे लागते. त्यानंतर त्यांनी प्रीतीला अदानीसोबत भेटण्यास तयार केले आणि दोघांची भेट झाली. पहिल्याच मुलाखतीत दोघांनी एकमेकांशी बातचीत केली आणि त्यानंतर प्रीती या लग्नाला तयार झाल्या. १९८६ मध्ये  प्रीती आणि गौतम यांचं लग्न झालं. लग्नानंतर प्रीती अदानी आणि गौतम अदानीसाठी काही काळ खूप कठीण होता. गौतम अदानी यांना कामानिमित्त अनेकदा बाहेर जावं लागायचं. पण जेव्हाही त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते त्यांची पत्नी आणि कुटूंंबासोबत वेळ घालवायचे.

               दोघांच्या लग्नाला आता ३६  वर्ष पुर्ण झाले. आजही त्यांचं वैवाहीक जीवन तेवढ्याचे प्रेमाणे भरलेलं आहे. शांतीलाल आणि शांताबेन अदानी यांच्या पाच मुलांपैकी गौतम हा पाचवा मुलगा आहे. गौतम अदानी यांना दोन मुलं आहेत. जीत अदानी आणि करण अदानी. करणचं लग्न झालं आहे ज्यांना एक मुलगी देखील आहे.  गौतम अदानी यांचे वय  आता ६० वर्षांचे झाले आहेत.   उद्योगानिमित्त त्यांना जगभर फिरावे लागते. पण वेळ मिळाला की  ते अहमदाबादेतील आपल्या घरीच राहणे पसंत करतात, हे विशेष.

 408 Total Likes and Views

0 Comments

No Comment.